संपादक शेख रेहान यांना त्यांच्या मुला-मुलीसह चिरडण्याचा प्रयत्न
बीड (एस.एम.न्युज) - जिल्ह्यात वाळू माफिया नंतर आता मुरूम माफीयांनी प्रशासनाला आव्हान दिल्याचे संपादक शेख रेहान यांना त्यांच्या मुला-मुलीसह चिरडण्याचा प्रयत्न झाल्याने दिसून आले. नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले अन्यथा माफियांपुढे आता बीड जिल्ह्यातील नागरिक व अधिकाऱ्यांची सुरक्षाही वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. या अवस्थेत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार माफियांना व्यसन घालतील का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, बीड शहरात राहणारे संपादक शेख रेहान हे त्यांचा मुलगा (वय ८ वर्षे) तर मुलगी (वय ५ वर्षे) या दोघांना घेऊन एक्टिवा मोटरसायकलने बार्शी नाका पुढील इमामपूर रस्त्यावर दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रविवार रोजी दुपारी साधारण ११:३० ते १२:०० वाजे दरम्यान काही कामानिमित्ताने गेले होते. तिथून परत येत असताना त्यांच्या मुलाने रेहान यांचा मोबाईल हातात घेऊन पाठीमागे बसून मोबाईलचा व्हिडिओ कॅमेरा सुरू करत रस्त्याचे, झाडांचे, आकाशाचे व्हिडिओ चित्रण मोबाईल मध्ये करायला सुरुवात केली. हे करत असताना काही अंतर पार केल्यावर याच रस्त्यावरून मुरूम घेऊन जाणारा एक टिप्पर (क्रमांक MH-04/JU4511) चालला होता. तेव्हा या टिप्पर चालकाचे लक्ष व्हिडिओ चित्रण करत असलेल्या रेहान यांच्या मुलाकडे गेले तसेच त्याने रेहान यांच्या एक्टिवावर प्रेस लिहिलेले पाहिले आणि त्याच्या मनात शंका निर्माण झाली व त्याने क्षणाचाही विलंब न करता रेहान यांची एक्टिवा पुढे जाऊ दिली आणि भरधाव टिप्परने त्यांच्या वर गाडी टाकून चिरडण्याचा प्रयत्न केला परंतु प्रसंगावधान ओळखून सावध होत रेहान यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांची दुचाकी जोरात रस्त्याखाली घेतली. यामुळे ते वाचले हे बघताच टिप्पर चालकाने पुढे जाऊन टिप्पर थांबविले व गाडीखाली उतरून रेहान यांच्याकडे तावातावाने येत काय तू प्रेस वाला काय? कशासाठी व्हिडिओ चित्रण करत होता? काय करायचंय तुला? असे रागा रागाने नको ते बोलून रेहान यांना धमकी दिली. या सर्व प्रसंगामुळे त्यांची मुले जाम घाबरली व त्यांनी रडण्यास सुरुवात केली. हे पाहून तो टिप्पर चालक पटकन टिप्पर मध्ये बसून पुन्हा त्याच भरधाव वेगाने निघून गेला. या प्रसंगाने आता बीड शहरातच नाही तर जिल्हाभरात वाळू माफिया नंतर मुरूम माफियांनीही डोके वर काढले असून त्यांनी प्रशासनाला आव्हान दिल्याचे दिसून आले आहे. रेहान आणि त्यांच्या मुलांचे नशीब बलवत्तर होते म्हणून ते वाचले अन्यथा प्रेस चा माणूस म्हणून चिरडण्याचा पूर्ण प्रयत्न मुरूम माफियाच्या टिप्पर चालकाने केला होता. हे पाहता वाळू माफिया नंतर आता मुरूम माफीयांनीही जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभे केल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे.
अनेक अधिकाऱ्यांनाही चिरडण्याचा झाला प्रयत्न
गेल्या काही महिन्यात वाळूमाफियांनी त्यांच्या चोरीच्या आड येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा चिरडण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. यातून नायब तहसीलदार, तहसीलदार, पोलीस निरीक्षक एवढेच काय दस्तूर खुद्द विद्यमान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे या सुद्धा सुटल्या नाहीत. अशा प्रकारे मोठ्या पदावरील प्रशासनिक अधिकाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने सुरक्षिततेचा प्रश्न तर उभा राहिलाच आहे. मात्र यामुळे माफीयांची हिम्मत वाढली आहे. म्हणून ते आता कुणालाही चिरडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
वाळू, मुरूम आणि डोंगर भागातील दगडाविषयी कडक आचारसंहिता बनवून त्यावर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक
सध्या बीडमध्ये जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व बीडचे तहसीलदार सुहास हजारे हे तिन्ही अधिकारी कर्तव्यतत्पर व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. जेव्हापासून या तिघांनीही आपापल्या पदावर येऊन कार्य हाती घेतले आहे तेव्हापासून त्यांनी चांगल्या प्रकारे कर्तव्य निभावण्याचे कार्य केले आहे. असे असूनही वाळू माफिया नंतर आता मुरूम माफीया सुद्धा यांना आव्हान देऊ लागले आहे. याला आता हे तिन्ही जबाबदार व कर्तव्यदक्ष अधिकारी माफीयाकडून मिळणाऱ्या आव्हानाला कशाप्रकारे सामोरे जातात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शेख रेहान तिन्ही अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार!
स्वतःसह आपल्या मुला-मुलीवर बेतलेल्या या प्रसंगाबद्दल सांगून निवेदन देण्यासाठी शेख रेहान हे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना स्वतः जातीने प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे व वाळू माफिया आणि मुरूम माफियांवर कारवाईचा फास आवळा म्हणून मागणी करणार असल्याचे "एस.एम.न्युज" शी बोलताना सांगितले.
=======================================
१} कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातमी आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल
२} वृत्तपत्रे व एस.एम.न्युज साठी जाहिराती आणि बातम्या स्वीकारल्या जातात
३} विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज
आसेफ़नगर, बीड
मो.- 9021 02 31 21
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा