Breaking News

आज बीड-औरंगाबाद व बीड-जालना महामार्ग वाहतुकीसाठी बंद वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा - पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर


बीड (एस.एम.न्युज़) - आज शनिवारी दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी मराठा आरक्षण सभेच्या निमित्ताने बीड-औरंगाबाद, बीड-जालना या महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली असून हे दोन्ही महामार्ग एक दिवसाकरिता वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. याकरिता वाहन चालकांनी इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.
            मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या संबोधन सभेचे आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजातील संबोधन सभेसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरून सुमारे ५ से ६ लाख लोक येण्याची शक्यता असून ही सभा मौजे अंतरवली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील १०० एक्कर जागेवर धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर होणार आहे. सभेसाठी सुमारे ३० ते ३५ हजार वाहने येण्याची शक्यता आहे. या सभेस मोठ्या प्रमाणात नागरीक आपआपली वाहने घेऊन येणार असल्याने वाहतूक कोंडी होऊन जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहन चालकांमध्ये किरकोळ बाबीवरुन वाद विवादाची परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तरी या मार्गावरून जाऊ इच्छिणाऱ्या वाहन चालकांनी आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ शनिवार रोजी पर्यायी मार्गांचा वापर करावा. असे आवाहन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.


बीड-औरंगाबाद साठी पर्यायी मार्ग -
बीड-पाडळसिंगी-मादळमोही खरवंडी- पाथर्डी-शेवगांव-पैठण-औरंगाबाद 
किंवा बीड-पाडळसिंगी-खरवंडी- पैठण-औरंगाबाद  

बीड-जालना साठी पर्यायी मार्ग -
बीड-गढी-माजलगांव-धोतरआष्टी-घनसांगवी-अंबड-जालना


वाहन चालक-मालकांनी नोंद घ्यावी

बीड-गेवराई-शहागड-अंकुशनगर-औरंगाबाद व बीड-गेवराई-जालना या मार्गावरील सर्व वाहतुक (सभेसाठी जाणारी वाहने, बंदोबस्तातील वाहने, ॲम्बुलन्स, अग्नीशामक दलाची वाहने वगळून) ही दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजीचे सकाळी ०८:०० ते रात्री ०८:०० वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतुक वरील मार्गाने वळविण्यात येणार आहे. याची सर्व वाहन चालक/मालक यांनी नोंद घ्यावी.

====================================

१] कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातमी आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल 
२] विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल 
३] वृत्तपत्रे व एस.एम.न्युज़ साठी बातम्या आणि जाहिराती स्वीकारल्या जातात 
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़ 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़ 
आसेफ़नगर, बीड. 
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत