Breaking News

तीस वर्षांपासून रस्ता व नाला बनवण्यात येत नसल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिना दिवशी जाहीर निषेध

 

नगराध्यक्ष व आमदारांच्या प्रतिमेस हार घालून व्यक्त केला संताप;अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती 

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील आसेफ़नगरचा मुख्य रस्ता व नाला गेल्या ३० वर्षापासून बनविण्यात येत नसल्याने याला कारणीभूत असलेले कायमस्वरूपी नगराध्यक्ष व विद्यमान आमदार यांच्या फोटोंना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिना दिवशी फुलांचा हार टाकून जाहीर निषेध करण्यात आल्याचे  आंदोलनकर्ते शेख मुबीन दादा भंगारवाले यांनी आंदोलन स्थळी बोलतांंना म्हटले. 
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, युनूस शेख, एस.एम.युसूफ़ यांच्या मार्गदर्शनाखाली शेख वसीफ, शेख खालेद, शेख अब्दुल हमीद, अहेमद फारोकी, रेहान फारोकी, मुहम्मद चाऊस, डॉ. काज़ी साहब यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
  
हे फक्त आंदोलन नाही तर जाहीर निषेध क्रमांक एक शाखेचे उद्घाटन आहे - डॉ. गणेश ढवळे
मानवाच्या सहनशीलतेला एक मर्यादा असते ती मर्यादा संपली की मनुष्य मग क्रांती करण्यासाठी पाऊल उचलतो. तेव्हा कामचुकार लोकप्रतिनिधी व भ्रष्ट अधिकाऱ्यांना पडता भुई थोडी होते. आसेफ़नगर मधून अशाच प्रकारे त्रस्त नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून जो जाहीर निषेध आंदोलन करत डिजिटल फलक आसेफ़नगर च्या मुख्य चौकात लावले ते बीड शहराला विकासाच्या नावाखाली संपूर्णतः भकास करून टाकलेल्या राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे असून या जाहीर निषेध च्या बॅनर ला राजकारण्यांनी फक्त एक बॅनर म्हणून न पाहता याला जाहीर निषेध शाखा क्रमांक एक म्हणून पाहायला हवे. लवकरच सत्ताधाऱ्यांसह बीड नगरपालिका प्रशासनाने वेळीच जनतेच्या नाराजीची दखल घेतली नाही व आवश्यक विकास कामे केली नाही तर अशा प्रकारे जाहीर निषेध च्या अनेक शाखा संपूर्ण बीड शहरात जनतेद्वारे तयार करण्यात येतील यात दुमत नाही.

सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन स्वीकारले !
कायमस्वरूपी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व विद्यमान आ. संदीप क्षीरसागर यांचा आंदोलने केल्याशिवाय विकासकामे करायची नाहीत. असा मानस तयार झाल्याचे बोलले जात असून हे जर खरे असेल तर मग त्रस्त नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आसेफनगर चा मुख्य रस्ता व नाल्यासाठी यापुढे एका मागून एक आंदोलने करण्यात येतील. हे आवाहन आम्ही स्वीकारल्याचे या आंदोलनावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले.

जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम. न्युज़
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत