जुमा मस्जिद विश्वस्तांकडून मुस्लिम महेदवीया समाजावर अन्याय ! एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल ची शासन-प्रशासनाकडे तक्रार
अहेमदनगर (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यातील भिंगार परिसरात असलेल्या जुमा मस्जिद शेजारी मुस्लिम महेदवीया समुदायातील संतांच्या काही कबरी आहेत. त्यांची अवस्था खराब झाली आहे. शिवाय कबरीवर त्यांच्या नावांच्या पाट्याही नाहीत म्हणून कबरींची ओळख व्हावी याकरिता संतांच्या नावांच्या पाट्या लावायच्या आहेत. क़ौम ए महेदवीया समाजाचे स्थानिक लोक हे कार्य करण्यासाठी गेले असता जुमा मस्जिदच्या विश्वस्तांनी विरोध केला व कबरीची आणि नावांच्या पाट्या लावण्यास महेदवीया जमाअ्तच्या सदस्यांना मज्जाव केला. ही बाब एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल चे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांना कळाल्यावर त्यांनी शासन-प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार करून भिंगार येथील जुमा मस्जिदच्या विश्वस्तांकडून होत असलेला महेदवीया समाजावरील अन्याय दुर करण्याची मागणी केली आहे. याविषयी शासन-प्रशासनातील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना पाठविलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, मुस्लिम महेदवीया समाजातील संत हज़रत बंदगी मियाँ सय्यद सादूल्ला रहमतुल्ला अलैह आणि त्यांच्यासह इतर संतांच्या कबरी भिंगार येथील जुमा मस्जिदच्या बाजूला आहेत. त्यांची अवस्था खराब झाली असून कबरींची नासधूस झाली आहे. तसेच कबरींवर संतांची नावे असलेल्या पाट्या लावायच्या आहेत. कारण महेदवीया समाजाचे लोक जगभरातून येथे संतांच्या मज़ारींवर ज़ियारत साठी येतात. कोणती कबर कोणत्या संतांची आहे हे कळावे म्हणून प्रत्येक कबरीवर त्या-त्या संतांच्या नावांची पाटी लावणे आवश्यक आहे. मात्र जुमा मस्जिद भिंगारचे विश्वस्तांकडून याला विरोध होत आहे. यामुळे विश्वस्तांना शासकीय-प्रशासकीय पातळीवर समज देऊन क़ौम ए महेदवीयाच्या स्थानिक लोकांना सदरील कबरीची डागडूजी, कबरीवर संतांच्या नावांच्या पाट्या लावण्यासाठी शासन-प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य करावे. अन्यथा क़ौम ए महेदवीया ला कायदेशीर कारवाई करावी लागेल. ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या दोन वेगवेगळ्या पंथीयांमध्ये वाद उद्भवण्याची व चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा इशाराही एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांनी शासन-प्रशासनाला पाठविलेल्या तक्रार पत्रात नमूद केले आहे.
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम. न्युज़
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा