महेदवीया मस्जीद अतिक्रमण मुक्त करा - डॉ. सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटनेकडून खा.प्रीतमताई व आ.संदीपभैय्यांना साकडे !
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील जुना बाजार भागातील लोहार गल्ली स्थित हवेली समोर असलेल्या महेदवीया मस्जीदला अतिक्रमणमुक्त करून मस्जीदची जागा महेदवीया जमाअ्तच्या ताब्यात देवून मस्जीद बांधण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे. अशी विनंती वजा मागणी एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांनी खा. प्रीतमताई मुंडे आणि आ. संदीपभैय्या क्षीरसागर यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
महेदवीया मस्जीद विषयी खासदार व आमदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मस्जीद ए महेदवीया जुना बाजार, लोहार गल्ली, येथे सुप्रसिद्ध हवेली समोर आहे. मस्जीद च्या जागेवर मुस्लीम समाजातीलच एका व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. मस्जीद अंशत: कोसळली आहे. मस्जीद वर अतिक्रमण केलेल्या व्यक्तीने मुस्लीम महेदवीया समुदायाला मस्जीदची पुनर्बांधणी करण्यास परवानगी दिली नाही. यामुळे बीड शहरासह आजूबाजूला राहणारा संपूर्ण मुस्लीम महेदवीया समुदाय मस्जीद शिवाय आहे. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याने मस्जीद ताब्यात घेऊन पुनर्बांधणी करण्याच्या स्थितीत नाही. यामुळे जिल्ह्याच्या खासदार व बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार या नात्याने ताई व भैय्यांनी मिळून मुस्लीम महेदवीया समुदायाला मस्जीद क्षेत्र परत मिळवून देण्यासाठी तसेच मस्जीद बांधण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे. अशी विनंती वजा मागणी एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सय्यद अली दिलावर (फ़र्रूख़) यांनी
केली आहे.
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क साधा -
एस.एम.युसूफ़ - मुख्य संपादक एस.एम. न्यूज़
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा