हज यात्रेला रवाना होण्यापूर्वी सर्वधर्म समभाव व एकात्मतेचा संदेश
बीड (एस.एम.न्युज़) - श्री. व सौ. रफ़ीक़ नाशाद येत्या मंगळवारी दि. २१ जून रोजी हज यात्रेला रवाना होत आहे. यानिमित्ताने श्री. व सौ. रमेशराव गंगाधरे यांनी त्यांना सपत्निक घरी बोलावून हृदयी शुभेच्छा दिल्या. यामुळे आपल्या भारतात असलेला सर्वधर्म समभाव व एकात्मतेचा संदेश पुन्हा एकदा पाहावयास मिळाला. यावेळी मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती.
इस्लाम धर्मात असलेल्या पाच फ़र्ज़ (कर्तव्य) पैकी एक असलेल्या सर्वात महत्वाच्या हज साठी मुस्लीम बांधव रवाना होत आहेत. पुढील जुलै महिन्यात ईद-उल-अज़्हा (बकरी ईद) दिवशी सौदी अरेबियातील मक्काह् येथे जगभरातून आलेल्या मुस्लिम बांधवांची हज यात्रा पूर्ण होणार आहे. या हज यात्रेकरिता घबराट वृत्तपत्राचे संपादक, कव्वाल तथा ए.आय.एम.आय.एम. पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष रफ़ीक़ नाशाद हे सपत्नीक येत्या मंगळवारी, दिनांक २१ जून रोजी बीडहुन रवाना होणार आहेत. यानिमित्ताने शहरातील ज्येष्ठ समाजसेवक तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी त्यांना घरी बोलावून पेढे भरवून पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत सौ. गंगाधरे सोबत हृदयी शुभेच्छा देत त्यांची हज यात्रा सकुशल व आनंददायी होवो अशा सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती. हज यात्रेनिमित्ताने दोन वेगवेगळ्या धर्मातील कुटुंबाच्या या छोटेखानी शुभेच्छा कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा आपल्या देशात असलेल्या सर्वधर्म समभाव व एकात्मतेचा संदेश मिळाला.
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड
मो:- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा