Breaking News

महेदवीया दायरा कब्रस्तान च्या विहिरीसाठी शफ़ीक़ भाऊंनी लक्ष घातले;प्रशासक व मुख्याधिकार्‍यांना निवेदन


बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तान ची विहीर पुनरुज्जीवित करून घेण्यासाठी एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफ़ीक़ भाऊ यांनी लक्ष घातले असून बीड नगर परिषदेचे प्रशासक टिळेकर साहेब आणि मुख्याधिकारी ढाकणे साहेब यांना जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी पदाधिकाऱ्यांसोबत भेटून याविषयी सविस्तर माहिती देत निवेदन दिले.
             कब्रस्तान सारख्या ठिकाणी मय्यत दफ़न करण्याकरिता, ज़ियारतसाठी येणाऱ्या ज़ायरिन करिता आणि कब्रस्तान च्या जमीनदोस्त झालेल्या भिंती बांधण्याकरिता या पुढारलेल्या युगातही पाण्याचा थेंब नाही हे पाहून फक्त आश्चर्यच होत नाही तर घोर शोकांतिका होत आहे. असे मत प्रशासक आणि मुख्याधिकारी यांच्यासमोर व्यक्त करत शफ़ीक़ भाऊंनी कब्रस्तान च्या विहिरी विषयी माहिती देतांना म्हटले की, जेव्हा मोमीनपुरा बायपास रस्ता निर्माण करण्यात आला त्यावेळी जेव्हा कब्रस्तान च्या विहिरी मध्ये वेस्टेज मटेरियल टाकून बुजवण्यात आली खरे तर तेव्हाच रस्त्याचे निर्माण कार्य संपताच विहिरीत टाकलेले दगड, गोटे, माती, मुरूम इत्यादी काढून कब्रस्तान ची विहीर स्वच्छ करून द्यायला हवी होती. परंतु तेव्हा हे कार्य करण्यात आले नाही. आता उशिराने का होईना महेदवीया कब्रस्तान च्या विहिरीला लवकरात लवकर पुनरुज्जीवित करून द्यावे. जेणेकरून जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटीला कब्रस्तानच्या जमीनदोस्त झालेल्या दोन्ही भिंतीच्या बांधकामासाठी, मय्यत दफ़न करण्यासाठी व ज़ियारत करिता येणाऱ्या ज़ायरीनसाठी पाण्याची सोय होईल असे म्हटले. 
यावेळी जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटीचे अध्यक्ष परवेज़ मोहम्मद, सचिव एस.एम.युसूफ़, कोषाध्यक्ष मोहम्मद आरेफ़, सदस्य नज़ीर मोहम्मद, ज्येष्ठ नेते अब्दुस सलाम सेठ, युवक जिल्हाध्यक्ष शेख मतीन, तालुकाध्यक्ष शेख एजाज़ खन्ना भैय्या, शहराध्यक्ष शिवाजी भोसकर, युवक शहराध्यक्ष शेख सलमान, शहर उपाध्यक्ष शेख शाकेर, शहर चिटणीस रहेमत पठाण, तालुका उपाध्यक्ष साजन चौधरी, सोशल मिडीया बीड शहर उपाध्यक्ष आमेर खान, इलयास बागवान, शहानवाज खान, नवीद इनामदार, वरिष्ठ मार्गदर्शक सय्यद ज़ाहेद भाई, सय्यद सैफ़ अली लालू भैय्या, नईम मेंबर, शेख बाबर भाई यांची उपस्थिती होती.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -
एस.एम.युसूफ़ (मुख्य संपादक एस एम न्यूज)
 आसेफ़नगर, बीड.
मो:- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत