Breaking News

आठ वर्षीय भावानंतर सहा वर्षीय शेख हिबा चा पहिला रोजा


बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील  आसेफ़नगर भागातील रहिवासी शेख वसीफ़ यांच्या आठ वर्षीय शेख नुबैद या मुलाने दोन दिवसांपूर्वीच आयुष्यातील पहिला रोज़ा पुर्ण केला होता. मोठ्या भावाने रोज़ा ठेवलेला पाहून त्याची लहान बहीण शेख हिबा हिने ही वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला.
घरातील मोठी मंडळी दररोज़ पहाटे उठून सहरी करत रोज़े धरताना त्यांच्यासोबत लहान मुलेही उठतात आणि सहरी करून रोज़े धरतात अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी शेख नुबैद या आठ वर्षीय मुलाने रोज़ा ठेवला हे पाहून तिची लहान बहीण शेख हिबा या सहा वर्षीय मुली ने ही काल आयुष्यातील पहिला रोज़ा ठेवून पूर्ण केला. एकीकडे सूर्य आग ओकत असताना, तापमान ४० अंशापेक्षा जास्त असताना जिथे भल्याभल्यांच्या जिवाची लाही लाही होत आहे, तिथे इस्लाम धर्माचा सर्वात पवित्र महिना म्हणून गणला जाणारा रमज़ान अशा उष्ण वातावरणात सुरू आहे. अशा वातावरणामध्ये दोन-चार तास जरी माणूस पाण्याविना राहिला तर त्याला अशक्तपणा आल्यासारखे वाटते. मात्र अशा वातावरणात सुद्धा पाच ते अकरा वर्षातील लहान मुले रोजा ठेवण्याचे धारिष्ट्य दाखवीत असल्याचे सगळीकडे दिसून येत आहे. यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत रोज़ा ठेवल्यानंतर रोज़ेदारांना अल्लाहकडून अदृश्य शक्ती  मिळते यावर शिक्कामोर्तब होतो. यामुळेच लहान मुलेही रोजा ठेवण्यास समर्थ ठरताना दिसतात. अशाच प्रकारे हिबा ने ही रोजा ठेवल्याने त्याचे आसेफ़नगरवासीयांसह दादा-दादी, नाना-नानी, अब्बू-अम्मी, बड़े अब्बू-बड़े अम्मी, फ़ुप्पूजान, सर्व भाऊ व बहीण आणि नातेवाईकांनी तिचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क -
एस.एम.युसूफ़ (मुख्य संपादक)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत