Breaking News

मानवतेला आर्त हाक;सय्यद अयाज़ यांच्या फुप्पुसावरील शस्त्रक्रियेसाठी दानशूरांनी पुढे यावे वर्षभरापासून अंथरुणाला खिळून;पाचवीत असलेल्या मुलीचे शिक्षण सुटले, मुलाचे पहिलीत प्रवेश होऊ शकले नाही



बीड (एस.एम.न्युज़) - औरंगाबाद येथील पिठाच्या गिरणी चे कामगार सय्यद अयाज़ हुसेन यांना फुप्फुसाचे आजार जडल्याने फुप्फुसाचे ट्रांसप्लांट करावे लागणार आहे. याकरिता लाखो रुपयांचा खर्च येणार असून समाजातील दानशूर, दानवीर व सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे. असे आवाहन सय्यद अयाज़ हुसेन यांनी भ्रमणध्वनीवरून कळविले आहे.
      याविषयी अधिक माहिती देताना सविस्तरपणे नमूद केले आहे की, बीड जिल्ह्या जवळ असलेल्या तथा मराठवाड्याची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात पिठाच्या गिरणीचे कामगार असलेले सय्यद अयाज़ हुसेन (वय ३७ वर्षे) यांना गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून फुप्फुसाचा आजार झाला आहे. यामुळे त्यांना ऑक्सीजन लावून घरीच ठेवण्यात आल्याने एवढ्या मोठ्या कालावधीपासून ते अंथरुणाला खिळून आहेत. यामुळे अगोदरच गरीब असलेल्या सय्यद अयाज़ कुटुंबीयाची आर्थिक स्थितीअजून बिकट झाली आहे. यामुळे एक मुलगी व दोन मुले अशी तीन अपत्य असलेल्या अयाज़ यांची मोठी मुलगी यावर्षी इयत्ता पाचवीत राहिली असती परंतु वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून तिचे वडील अंथरुणावर खिळून असल्याने गेल्या वर्षभरापासून तिचे शिक्षण सुटले आहे. तर यावर्षी इयत्ता पहिलीत प्रवेशाचे वय असलेल्या मधल्या मुलाला शाळेत टाकता आले नाही. घरी ते एकटेच कमावते असून तेच अंथरुणावर खिळून पडल्याने व ऑक्सिजन विना राहू शकत नसल्याने दररोजच्या ऑक्सिजन वर खर्च करण्याकरिता सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. औरंगाबाद शहरातील बिलाल कॉलनीमध्ये ते एका भाड्याच्या खोलीत राहतात. सोबत त्यांची विधवा आई, गृहिणी असलेली पत्नी आणि तीन मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या फुप्फुसाचे ट्रान्सप्लांट करावे लागतील. याकरिता ४५ ते ५० लाख रुपयांपर्यंतचा खर्च येईल असे म्हटल्याचे सय्यद अयाज़ यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी म्हटले आहे. परंतु त्यांच्याकडे पैसा नसल्याने ते गेल्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून दररोज मरणाला समोर पाहत आहेत. आपल्या पश्चात आपल्या आई, पत्नी व मुलांचे काय होईल ? या चिंतेने ते ग्रासले आहेत. ते बरे व्हावेत त्यांच्या रूपात त्यांच्या आई, पत्नी व मुलांवर त्यांचे छत्र अबाधित राहावे. त्यांची फुप्फुसाच्या या भयानक रोगापासून सुटका व्हावी. याकरिता आता समाजातील दानवीर, दानशूरांसह सामाजिक संस्थांनी पुढे येऊन सढळ हस्ते आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. आपल्याकडून आर्थिक मदत दिल्या गेल्याने एक कुटुंब कर्त्याविना पोरके होण्यापासून वाचू शकते. म्हणून ऐपत असलेल्या दानशूर, दानवीर आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्यांना सढळ हस्ते आर्थिक मदत करावी. असे आवाहन सय्यद अयाज़ हुसेन यांनी केले असून आर्थिक मदतीकरिता सय्यद अयाज़ हुसेन यांच्या ८४२१२५३०२३ या मोबाईल क्रमांकावर फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम यापैकी कोणत्याही पद्धतीने आर्थिक मदत देऊ शकता. अशी माहिती सय्यद अयाज़ हुसेन यांनी भ्रमणध्वनीवरून कळविली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत