Breaking News

शेख नुबैद चा आठव्या वर्षी पहिला रोजा



बीड (एस.एम.न्युज) - शहरातील  आसेफ़नगर भागातील रहिवासी शेख वसीफ़ यांचा मुलगा शेख नुबैद याने वयाच्या आठव्या वर्षी आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. याकरिता त्याचे आसेफ़नगरवासीयांसह नातेवाइकांकडून अभिनंदन होत आहे.
सध्या सगळीकडे सूर्य आग ओकत आहे. रखरखते कडक ऊन असल्याने सर्वांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात भरीस भर म्हणून राज्य शासन व महावितरण कंपनीने म्यान केलेले इमर्जन्सी लोडशेडिंगचे हत्यार पुन्हा उपसल्याने विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. यामुळे दिवसभर पंखे व कुलर वापरणे दूभर झाले आहे. अशा अवस्थेत सध्या रमज़ान महिन्याचे रोज़े सुरू आहेत. घरातील मोठी मंडळी दररोज पहाटे उठून सहरी करत रोज़े धरताना त्यांच्यासोबत लहान मुलेही उठतात आणि सहरी करून रोज़े धरतात अशाच प्रकारे शेख नुबैद या आठ वर्षीय मुलाने ही आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. यामुळे आसेफ़नगरवासीयांसह दादा-दादी, नाना-नानी, अब्बू-अम्मी, बड़े अब्बू-बड़े अम्मी, फ़ुप्पूजान, सर्व भाऊ व बहीण आणि नातेवाईकांनी त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत