Breaking News

एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाध्यक्षपदी सय्यद नेमत मियाँ यांची निवड



बीड (एस.एम.न्युज़) - महेदवीया समाजाच्या एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाध्यक्षपदी सय्यद नेमत मियाँ नुसरती महेदवी यांची निवड करण्यात आली आहे.
एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दीलावर उर्फ़ फर्रुख़ व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज़ाफ़र सादिक़ यांनी सय्यद नेमत मियाँ नुसरती महेदवी यांची पश्चिम महाराष्ट्र विभागाध्यक्षपदी निवड जाहीर केली असून त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना हज़रत पीर ओ मुर्शिद सय्यद महेमूद मियाँ नुसरती महेदवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नेमत मियाँच्या नियुक्तीनंतर त्यांना एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी अभिनंदन करत त्यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्रात संघटनेकडून महेदवीया जमाअ्त साठी उज्वल कार्य होवो अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत