डुबकी लगाव आंदोलनास पाठिंबा;प्रत्यक्ष सहभागी होणार - डॉ. गणेश ढवळे
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाच्या निर्माणाकरिता करण्यात येणाऱ्या लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलनास आपला पाठिंबा असून या आंदोलनात आपण स्वतः जातीने सहभागी होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील जनतेची मागणी असून सुद्धा खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवरील नियोजित पूल आजपर्यंत निर्माण करून देण्यात आलेला नाही. गेल्या पाच वर्षांत या पुलासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून शासकीय-प्रशासकीय स्तरावर अनेक निवेदने देण्यात आली परंतु पुलाचा प्रश्न काही मार्गी लागला नाही. म्हणून एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ आणि सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास दिनांक ११ ऑक्टोबर, सोमवार रोजी सकाळी ११ वाजता नियोजित पुलाच्या जागी बिंदुसरा नदी मध्ये डुबकी लगाव आंदोलन करणार असल्याने बीडकरांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या नियोजित पुलासाठी आपलाही या लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलनाला पाठिंबा असून आपण स्वतः या आंदोलनात जातीने सहभागी होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा