हावरे ज़ीनत चा आयुष्यातील पहिला रोज़ा पूर्ण
बीड (एस.एम.न्युज़)- हावरे ज़ीनत इलयास (बबलु) हिने आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. सध्या पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू आहेत तसेच उन्हाळा ही तप्त आहे. दिवसभर सूर्य आग ओकत आहे. यामुळे तरुण आणि वयस्क रोजेदार सुद्धा उन्हाने घायाळ होत आहे. अशा अवस्थेमध्ये सात वर्षीय ज़ीनत ने आपल्या आयुष्याचा पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण केला. याबद्दल त्याचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आजी-आजोबा, आई-वडील, मामा-मामी, आत्या-मामा, बहिण ज़ोया, भाऊ मुहम्मद नवाज़ आणि मामा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम. युसूफ़ यांनी ज़ीनत ला भरभरून शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले की, तिने यापुढेही आयुष्यभर असेच रमजान महिन्याच्या रोजाचे पालन करावे.
====================
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़ ,
बीड.
संपर्क :- 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा