Breaking News

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात घाटी औरंगाबाद च्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय निर्माण करा - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात घाटी औरंगाबाद च्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय निर्माण करावे. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
      याविषयी निवेदनात सविस्तर नमूद केले आहे कि, देशभर काहूर माजविणाऱ्या कोरोना महामारी ने महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा किती तोकडी आहे हे दाखवून दिले.अक्षरशः उघडे पाडले आहे.एरवी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयासह उभे राहिलेल्या खाजगी डॉक्टरांच्या टोलेजंग इमारती पाहून वाटायचे की, डॉक्टर आणि दवाखान्यांचा बुजबुजाट झालाय. परंतु हा भ्रम किती खोटा होता,याचा प्रत्यय कोरोना महामारीने आणून दिला.तरीपण एकूण जनसंख्येच्या मानाने कोरोना चे रुग्ण दहा टक्के सुद्धा नाहीये.तरीही या रुग्णांना जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात सुद्धा दाखल करून घेण्यासाठी जागा आणि बेड शिल्लक नाहीये. ही वस्तुस्थिती पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.या अवस्थेमुळे महाराष्ट्राची नाचक्की होत आहे.यात भर म्हणून औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांनी बीड, जालना,परभणी,अहेमदनगर या जवळच्या जिल्ह्यातील अनेक दशकांपासून राजकीय नेतृत्व करणाऱ्या मातब्बरांच्या कर्तृत्वावर सोशल मीडियाच्या माध्यमातून खरमरीत ताशेरे ओढल्याने खरेच या उल्लेख केलेल्या जिल्ह्यातील राजकारण करताकरता करोडपती-अरबपती झालेल्या राजकारण्यांना शरमेने मान खाली घालायला लावली असून जलील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडे नक्कीच नाहीत.एरवी साध्या दिवसांमध्ये मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यांमधून क्रिटिकल रुग्ण असल्यास त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये पाठविले जाते.ही प्रथा घाटी रुग्णालय अस्तित्वात आल्यापासून आजतागायत जशीच्या तशी सुरू आहे.परंतु ही पद्धत किती चुकीची आहे हे कोरोना ने दाखवून दिले. घाटी रुग्णालय जेव्हा निर्माण झाले त्यावेळची जनसंख्या आणि आजच्या जनसंख्येमध्ये कित्येक पटीने वाढ झाली आहे.आता घाटी रुग्णालयापुरता जरी विचार केला तर हे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय औरंगाबाद जिल्ह्यातल्याच रुग्णांना सामावून घेण्यास कमी पडत असल्याचे वेळोवेळी दिसून येते.त्यातच तिथे हजारोंच्या संख्येने डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ ची कमतरता आहे.अनेक वर्षांपासून तेथील रिक्त जागा  भरल्या जात नाहीत.अशा अवस्थेमध्ये इतर जिल्ह्यातील क्रिटिकल रुग्ण तिथे पाठविणे हे लक्षण योग्य नाही.याला कुठेतरी आता आळा बसावा आणि राज्यातील प्रत्येक जिल्हा हा आरोग्य सेवेच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावा.प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय निर्माण व्हावे.तिथे आवश्यक संख्येत डॉक्टर्स,नर्सिंग स्टाफ २४ तास उपलब्ध असावे.या दृष्टिकोनातून पाऊल उचलण्याची गरज आहे. राज्यातील जनसंख्या शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय रुग्णालयाच्या मानाने कित्येक पटीने जास्त वाढलेली आहे.आता जनसंख्येच्या मानाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय निर्माण करण्याची आवश्यकता असून या बाबीकडे विशेष लक्ष देऊन राज्य शासनाचे प्रमुख म्हणून आपण यात जातीने लक्ष घालावे आणि आरोग्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्हा परिपूर्ण करावा.अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
एस.एम.युसूफ़ 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़,
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत