... तर 'ते' मास्क वाटप करू नका; घातक असेल तर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - सध्या कोरोनामुळे अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते आपापल्या परीने मास्क वाटप करण्याचा कार्यक्रम घेत आहे. यामध्ये मेडिकल वर मिळणारे सर्वात स्वस्त असे युज अँड थ्रो मास्क वाटप करणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येते. मात्र ते मास्क माणसाच्या आरोग्यासाठी लाभदायक नसल्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही बाब जर खरी असेल तर मेडिकल वरील सर्वात स्वस्त असलेले हे मास्क वाटप करण्यात येऊ नये. तसेच विकणाऱ्यांवर कारवाई करावी असे आवाहन केले आहे.
याविषयी सविस्तर असे की, कोरोना महामारी बाबत अजूनही जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था आहे. म्हणून आजही अनेक जण मास्क विना फिरत असल्याचे दिसून येते. विना मास्क फिरणाऱ्यांकडे पाहून अनेक सेवाभावी संघटना व सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीने मेडिकलवर सहज आणि सर्वात स्वस्त मिळणारे युज अँड थ्रो मास्क रस्त्यावर उभे राहून वाटप करत असताना प्रसिद्धी माध्यमातून याचे फोटो आणि बातम्या प्रकाशित होतांना आपण पाहत आहोत. तर दुसरीकडे मेडिकल वरील ते मास्क फक्त ऑपरेशन थिएटर मध्ये काम करणारे डॉक्टर्स आणि सपोर्टिंग स्टाफ यांना थोड्यावेळासाठी वापरण्यास ठीक आहे. मात्र सातत्याने ते मास्क नाका-तोंडावर लावून फिरल्याने आरोग्य समस्या तसेच दुर्गंधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. आरोग्य तज्ञांच्या दृष्टीने जर हे खरे असेल तर आरोग्य तज्ञांनी याबाबत जनजागृती करावी. तसेच आरोग्य विभागाने सर्व मेडिकल दुकानदारांना याबाबत निर्देश द्यावे की, त्यांनी ते मास्क आरोग्य विभागा व्यतिरिक्त इतर कोणालाही विकू नये. जर ते मास्क माणसाच्या आरोग्यासाठी घातक असेल तर ते जनतेला विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी. असे आवाहन केले आहे.
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़,
बीड.
संपर्क क्र :- 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा