Breaking News

गोरगरीबांचे रमज़ान आनंदाविना; सधनांनी आनंद फुलवावा - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला रमज़ान महिना गोरगरिब मुस्लीमांना आनंदाविना असल्याने सधनांनी गोरगरिबांच्या रमज़ान मध्ये आनंद फुलवावा असे आवाहन केले आहे.
          याविषयी सविस्तर असे की, इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिन्याचा दर्जा असलेला रमज़ान महिना गेल्या १५ दिवसांपासून सुरू असून महिन्यातील १५ रोज़े पार पडले आहेत. या पंधरा दिवसांमध्ये प्रत्येक गोरगरीब मुस्लिम बांधवांना हवे त्या प्रमाणात पैसा आणि अन्नधान्य प्राप्त होत नसल्याने कोरोना, लॉक डाऊन आणि कर्फ्यू च्या याकाळात हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणारे मुस्लिम कुटुंबीय, लहान-सहान, सटर-फटर उद्योग करणारे छोटे-छोटे व्यापारी अत्यंत विदारक परिस्थितीला तोंड देत आहेत. शासन-प्रशासनाकडून  दिलासादायक कोणतीही योजना गोरगरीबांसाठी राबविण्यात येत नाहीए आणि पुढे चालून जर शासनाने कोणतीही योजना घोषित केलीच तर त्याची अंमलबजावणी होईपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असेल. तसेच प्रत्येक योजनेच्या सुरुवातीपासूनच भ्रष्टाचार होत असल्याने ती पूर्णतः जनतेच्या हाती पडत नाही. अशा अवस्थेमध्ये गोरगरिबांना जगविण्याचे कार्य इस्लाम धर्मात असलेल्या जकात या एका फर्ज मुळे काही प्रमाणात का होईना करता येते. मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात सधन कुटुंबे असूनही गोरगरीब मुस्लिमांचे रमज़ान आनंदाविना जात आहे. रमज़ान महिना व रोज़े संपायला अजून अर्धा महिना बाकी आहे. या उरलेल्या दिवसात जर सधन कुटुंबीयांनी आवश्यक त्या प्रमाणात ज़कात किंवा इतर मदत गोरगरीब मुस्लीम कुटूंबियांना केली नाही तर ते रमज़ान ईद आनंदात साजरी करण्यापासून वंचित राहतील. त्यांच्या मुलाबाळांच्या अंगावर गेल्या वर्षी सारखे ईद दिवशी फाटके-तुटके कपडे राहतील. गेल्यावर्षी सुद्धा अनेक गोरगरीब कुटुंबीयांची ईद कोरोना आणि लॉक डाऊन मुळे अशाच प्रकारे गेली होती. यावेळी सुद्धा असेच चिन्ह आहे. निदान गोरगरिबांच्या मुलाबाळांना कपडे व त्यांच्या घरात ईद चे सामान दिल्यास अशा गोरगरिबांची रमज़ान ईद आनंदाने साजरी होऊ शकते. तेव्हा कोरोना, लॉक डाऊन, कर्फ्यू अशा चक्रव्यूहात अडकलेल्या गोरगरिब मुस्लीमांना जकात च्या माध्यमातून का होईना पुढे येऊन सढळ हस्ते दानधर्म केल्यास आनंदाविना जात असलेले रमज़ान आनंदा ने साजरे होईल आणि ईद ही. तेव्हा सधनांनी आर्थिक मदत आणि अन्नधान्य देऊन गोरगरिबांमध्ये आनंद फुलवावा असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून केले आहे.
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत