बदलत्या भारतात आता सत्कारमूर्तींना पेट्रोल द्यावे - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - समाजात आता सत्कार करण्याचे आणि सत्कार घेण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. ज्यामध्ये मुख्यत्वे पुष्पगुच्छ दिले जाते. या ऐवजी बदलत्या भारतात आता सत्कार करणाऱ्यांनी सत्कार मूर्तींना सप्रेम भेट म्हणून पेट्रोल द्यावे.
याविषयी सविस्तर असे की, काही काळापूर्वी सत्कार करताना सत्कार मूर्तींना फक्त नारळ व शाल दिले जायचे. पुढे त्यात फुलांच्या हार चाही समावेश झाला. परंतु कालांतराने यात बदल होऊन अलीकडच्या काळात फक्त महाग मोलाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याची प्रथा सुरू झाली. जेव्हा नारळ, शाल व फुल-हार देऊन सत्कार केले जायचे, तेव्हा नारळ खाण्याकामी तर शाल वापरण्यास मिळायची तसेच गळ्यात घातलेले हार सत्कार मूर्तींच्या घरी स्त्रियांना वेणीत लावायला कामी यायचे. परंतु आता या सर्वांऐवजी फक्त पुष्पगुच्छ दिले जात आहे. ज्याची किंमत शंभर रुपयांपासून हजारच्याही पुढे असते. एवढी रक्कम गुंतवून फक्त काही क्षणाकरिता हे पुष्पगुच्छ देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या हाती असते. नंतर ते कचराकुंडीच्या स्वाधीन केले जाते. कारण ते दुसऱ्यांदा कोणत्याही कामी येत नाहीत. हे पाहता आता बदलत्या काळाची गरज म्हणून सत्कार करणाऱ्यांनी सत्कार मूर्तींना फुल-हार व पुष्पगुच्छ ऐवजी सप्रेम भेट म्हणून पेट्रोल देण्यास सुरुवात करावी. कारण अलीकडच्या काळात साध्या पेट्रोल ने शंभरी गाठली असून, पाँवर पेट्रोल ने शंभरी पार केली आहे. आणि जवळपास प्रत्येकाकडे दुचाकी वाहन असल्याने फुल-हार व पुष्पगुच्छ ऐवजी पेट्रोल ही प्राथमिक गरज झाली आहे. म्हणून सत्कार कार्यक्रमात देऊ इच्छित असलेल्या पुष्पगुच्छाच्या किंमती एवढ्या पेट्रोलची देवाण-घेवाण झाली तर वाढत्या महागाई मध्ये देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांनाही विशेष आत्मिक समाधान लाभेल. दिलेल्या सप्रेम भेटीचे मोल ही लक्षात राहील आणि भेट मिळालेल्या सत्कार मूर्तींचे पेट्रोल वर खर्च होणारे चार पैसेही वाचतील. म्हणून सत्कार करताना व घेताना आता बदल व्हायला हवा. शेवटी आपला भारत बदलत आहे. तेव्हा आपल्या रूढी-परंपरा बदलण्यास हरकत नसावी.
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
तथा मुक्त पत्रकार, बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा