कु. प्रगती जितेंद्र वडमारे ची बीएएमएस वैद्यकीय शिक्षणासाठी शासकीय कोट्यातून निवड
वडमारेंची कु.प्रगती वैद्यकीय क्षेत्रात प्रगती साधणार
छोटीशी किराणा दुकान चालक जितेंद्र वडमारे यांची मेहनत फळाला येणार
बीड।एस.एम.न्युज़ - शहरातील राजुरी वेस भागात असलेल्या भीमराज नगर येथील एका छोट्याशा किराणा दुकानाचे चालक जितेंद्र वडमारे यांची सुकन्या कु. प्रगती वडमारे हिची बीएएमएस वैद्यकीय शिक्षणासाठी शासकीय कोट्यातून निवड झाली असून तिला राजश्री शाहू आयुर्वेद महाविद्यालय बुलढाणा येथे वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे.
कु.प्रगती वडमारे हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्कार विद्यालयात झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण बलभीम महाविद्यालयात झाले आहे. यानंतर नीट परीक्षेच्या माध्यमातुन ती बीएएमएस या वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरली आहे.
यानिमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी कु.प्रगती वडमारे चे शाल, पुष्पगुच्छ देत पेढे भरवून अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कु.प्रगतीसह आई नेहा वडमारे, वडील जितेंद्र वडमारे यांचेही अभिनंदन केले आणि प्रगतीने नावाप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती करावी. डॉक्टर होऊन सर्वसामान्य रुग्णांची मनोभावे सेवा करावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी बाळू कांडेकर, किशोर जोगदंड यांची उपस्थिती होती.
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा