सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी; १५६ पदांची भरती!इच्छुक उमेदवारांनी तहसील, उपविभागीय कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन
सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी; १५६ पदांची भरती!
इच्छुक उमेदवारांनी तहसील, उपविभागीय कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन
नाशिक।एस.एम.न्युज़
शासनाने नाशिक जिल्ह्यातील १५६ महसूल सेवक (कोतवाल) पदे भरण्यास मान्यता दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी तहसील, उपविभागीय कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन कुंदन हिरे उपजिल्हाधिकारी, (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांनी केले आहे.
महसूल सेवक (कोतवाल) या भरती प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी समिती अध्यक्ष आहेत. रिक्त पदांचे सज्जे निहाय आरक्षण सोडत पार पडलेल्या आहेत. उमेदवार यांना जाहीरात व इतर निकष सबंधीत तालुक्यात तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, एन.आय.सी. संकेत स्थळावर पहाता येईल. फॉर्म ऑनलाईन भरता येणार आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन घेण्यात येईल. इच्छुक उमेदवार यांनी तात्काळ तहसील, उपविभागीय कार्यालया कडे संपर्क करावा. असे आवाहन कुंदन हिरे उपजिल्हाधिकारी, (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांनी केले आहे.
तालुकानिहाय भरावयाची रिक्त पदे खालील प्रमाणे
नाशिक - १६, सुरगाणा १००% - १२, त्र्यंबकेश्वर १००% - ३, पेठ १००% - ४, बागलाण - २६, देवळा - ८, इगतपुरी - १०, दिंडोरी - १६, कळवण १००% - १४, चांदवड - ४, निफाड - ११, येवला - ५, सिन्नर - ७, मालेगांव - १४, नादगांव - ६ अशी एकूण १५६ महसूल सेवक (कोतवाल) ची रिक्त पदे भरली जाणार आहे. अशी माहितीही कुंदन हिरे उपजिल्हाधिकारी, (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांनी दिली आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा