अमरजान पठाण यांचा ऐतिहासिक कारंजा टॉवर समोर हृदयी सत्कार; वसीम शेख यांच्यासह उपस्थित मित्र मंडळी कडून शुभेच्छांचा वर्षाव!
अमरजान पठाण यांचा ऐतिहासिक कारंजा टॉवर समोर हृदयी सत्कार
वसीम शेख यांच्यासह उपस्थित मित्र मंडळी कडून शुभेच्छांचा वर्षावबीड।एस.एम.न्युज़
अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती च्या देशव्यापी संघटनेत अमरजान पठाण यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली. या अनुषंगाने त्यांचा मित्र मंडळींकडून बीड शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवर समोर हृदयी सत्कार करत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
आपल्या या मित्राची पत्रकार संघटनेतील जिल्हाध्यक्ष सारख्या महत्त्वाच्या पदावर फेर निवड झाल्यामुळे समाजसेवक वसीम सलीम शेख यांनी ऐतिहासिक कारंजा टॉवर समोर अभिनंदनपर एक छोटेखानी सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस चे संपादक एजाज़ शेख, मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, इद्रीस शेख, दैनिक सत्यवादी चे संपादक रेहान शेख ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांची प्रमुख उपस्थिती होती. वसीम शेख यांच्यासह सर्व उपस्थितांनी अमरजान पठाण यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना बीड जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही अधिक जोमाने आणि मोलाचे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा