Breaking News

आपण माणसं आहेत की,जनावर?

 

  आपण माणसं आहेत की,जनावर?

सप्रेम जय भीम🙏
बांधवांनो,मी प्रशांत वासनिक बीड. परिवर्तनवादी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर आजच्या परिस्थितीबाबत काही विचार मांडत आहे.आपण जर माझ्या या विचाराशी सहमत असाल तर हा लेख इतरांना देखील शेअर करा व काही चुकीचं असेल तर मला दुरुस्ती अवश्य सुचवा!
बांधवांनो, आजची परिस्थिती आपण पाहत आहोत की,
आपण बसलोत मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,आरक्षणाचे उपवर्गीकरण करत आणि तिकडे पूर्ण देश विकण्याचे,बरबाद करण्याचे व बदनाम करण्याचे काम चालू आहे.खरंतर यात लुटणाऱ्यांचा व बरबाद करणाऱ्यांचा काहीच दोष नाही. दोष तर त्या लोकांचा आहे,जे लोक वारंवार मूर्ख बनत आहेत.
खरंच इंग्रज भारतातून जाताना हे बोलून गेले होते की,तुम्ही या देशाचे स्वातंत्र्य शंभर वर्ष तरी टिकवू शकाल की,नाही यात शंका आहे.आणि ती गोष्ट आज खरी ठरली आहे.खरंतर मोठ्या खेदाने म्हणावं लागतं की,हा देश वारंवार गुलाम होण्याचे मुख्य कारण हे आहे की,या देशातील लोक गुलाम मानसिकतेचे आहेत.
वारंवार आपलाच देश का गुलाम होत चालला आहे याच्यावर कोणीच विचार करत नाही.या गुलामगिरीचे मूळ इथली जातिव्यवस्था आणि धर्म व्यवस्था आहे.प्रत्येक वेळी राजकारणात देखील जातीचा आणि धर्माचा आधार घेतला जातो व लोकांना भावनिक करून त्यांच्या भावनिकतेचा गैरफायदा घेतला जातो परंतु जे लोक आपल्या भावनिकतेचा गैरफायदा घेतात त्यांचा काय दोष!दोष तर वारंवार मूर्ख बनणाऱ्यांचा आहे.प्रत्येकाला वाटतं मी अमुक धर्माचा आहे माझाच धर्म मोठा असला पाहिजे माझ्याच धर्माची सत्ता असली पाहिजे परंतु देश हिताचा कोणीही विचार करत नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मी प्रथम या देशाचा नागरिक आहे आणि अंततः ही या देशाचा नागरिक आहे.आपण धर्माचा आणि जातीचा विचार करता करता आज देश संपूर्णतः भिकेला लागला आहे.
या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे आपले संसार उध्वस्त होताना त्यांनी डोळ्यांनी पाहिले आहेत परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले बलिदान केले तेच लोक आहेत की या देशाला गुलामीच्या गर्तेत ढकलत आहेत.ज्या लोकांना या देशांमध्ये वारंवार माणसांनाच ठिकाण किंवा मानसन्मान मिळतो त्या लोकांनी खरं तर या देशाला बरबाद केले आहे.आपण पाहिलं तर देशातून हजारो कोटी रुपये घेऊन देश सोडून पळून जाणारे जेवढे लोक आहेत त्यात एकही मागासवर्गीय नाही किंवा मुसलमान नाही. जेवढ्या लोकांनी लाखो कोटींचे कर्ज घेतले आहे ते सर्व माफ करण्याचे काम सरकार करत आहे या कर्जदारांमध्ये एकही मागासवर्गीय किंवा मुसलमान नाही परंतु वारंवार याच दोन जातीला बदनाम करण्याचे काम होत आहे.देशातला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून आरक्षण मिळाले म्हणून मागासवर्गीयांना व मुस्लिमांना थोडा बहुत सत्तेचा लाभ मिळाला आहे नाही तर संविधान जर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले नसते तर या देशातील मूळनिवासी दलित आदिवासी मुसलमान या लोकांना इथल्या जातीवादी मानसिकतेने तडफडून मरायला भाग पाडले असते. आजही तीच परिस्थिती आहे, परंतु कोणाच्या लक्षात येत नाही कारण आपल्या डोळ्यावर जातीचे आणि धर्माचे चष्मे लागलेले आहेत.या चष्म्यातून तुम्हाला देश बरबाद होत असलेला दिसत नाही किंवा आपल्या लेकरांचे भविष्य उध्वस्त होत असताना देखील दिसत नाही.या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? याचा विचार देखील आपल्या मनात येत नाही.भारत हा सम्राट अशोकाचा उज्वल व जाज्वल्य देश होता परंतु इथल्या जातीवादी आणि धर्मवादी व्यवस्थेने या देशाला दरिद्री देश म्हणून जगामध्ये प्रसिद्ध केले आहे.या देशाची अस्मिता संपवण्याचे काम देखील इथली ब्राह्मणी व्यवस्था करत आहे.आपण पाहतो की वारंवार विदेशामध्ये जाऊन अतिशय नीच पद्धतीने प्रधानमंत्री चे वागणे बोलणे हसणे हे कोणत्या गोष्टीचे धोतक आहे? ज्या देशाला सोने की चिडिया म्हणायचे किंवा संस्कृतीचे माहेरघर म्हणायचे!या देशाने जगाला बुद्धासारखा महामानव दिला आहे त्या देशाकडे इतर देश आता हीन आणि तुच्छ भावनेने पाहत आहेत.देशाचे सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपती त्या पदाची गरिमा देखील इथल्या व्यवस्थेने धुळीस मिळविली आहे.राष्ट्रपती म्हणजे देशाचा राजा!त्या राजाला देखील एखाद्या मंदिरामध्ये पूजेला येऊ दिले जात नाही यावरून समजते की इथली जातीवादी व्यवस्था किती नीच पातळीची आहे!
आपल्या देशातील अनेक बहुजन समाजात जन्माला आलेले राजे आपण पाहिलेत,त्यांचा अपमान त्यांच्या डोळ्यादेखत इथल्या धर्मवादी व जातीवादी मानसिकतेने केला आहे ते देखील आपण कसे पचवले हेच समजत नाही.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान देखील आपण स्वतःला परिवर्तनवादी म्हणून घेणारे लोक पचवत आहेत.एवढेच काय तर महापुरुषांच्या बाबत अनेक अश्लील प्रकारचे वक्तव्य येथे तथाकथित धर्माचे ठेकेदार वारंवार करतात परंतु आम्हाला त्याचा रागच येत नाही.राग न येणे म्हणजे एक तर नपुसकता किंवा जिवंत नसणे होय.मग आम्ही विचार केला पाहिजे की,आमच्या महापुरुषांनी व या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे योगदान आणि बलिदान दिले आहे त्याला आपण टिकवायचे की नाही!आताही वेळ गेलेली नाही बहुजन समाजातील लोकांनी एक उठाव केला पाहिजे की जे लोक या देशातील मूळ रहिवासी नाही त्यांची कोणत्याच प्रकारे गुलामगिरी करायची नाही! त्यामध्ये धार्मिक गुलामगिरी,सांस्कृतिक गुलामगिरी,राजकीय गुलामगिरी,शैक्षणिक गुलामगिरी व आर्थिक गुलामगिरी. यापैकी कोणतीही गुलामगिरी असेल ती आपण झुगारून टाकली पाहिजे.
परंतु हे माझ्या आधी अनेक लोकांनी सांगून परिवर्तन करण्याचे काम केले आहे परंतु त्यांना किंचितही यश आल्यासारखे दिसत नाही उलट दिवसेंदिवस या देशाला गुलामीच्या खाईत लोटण्याचे काम होत आहे.आम्हाला नेमकी जाग तरी कधी येणार आहे?हा प्रश्न पडत आहे.मुक्या प्राण्याला देखील एक दोन वेळा चारा नाही टाकला तर ते समजून जातात की,ही व्यक्ती मला मूर्ख बनवत आहे परंतु शेकडो वर्षापासून भारतातील माणसांना(?) मूर्ख बनवलं जात आहे तरीसुद्धा यांना बुद्धी का येत नाही हा खूप मोठा यक्ष प्रश्न आहे!या देशाचे संविधान जर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले नसते तर या देशाची काय परिस्थिती असती याची कल्पना देखील करू वाटत नाही.खऱ्या अर्थाने या देशाला जर स्वतंत्र कोणी केलं असेल तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे! हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य व स्पष्ट आहे!परंतु इथली जातिवादी व धर्मवादी मानसिकता केवळ त्यांच्या जातीमुळे त्यांना दुर्लक्षित करत आहे आणि ज्या लोकांनी इथल्या लोकांना मूर्ख बनवून आपल्याला गुलाम करणाऱ्या इंग्रज सरकारला कायम मदत केली व त्यांची चमचेगिरी केली त्या लोकांना मोठे सन्मानाचे स्थान मिळताना आपण पाहतो.महापुरुषांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत देखील त्यांचेच नाव आहेत जे लोक इंग्रजांची दलाली करून पेन्शन आणि पगारी मिळवायचे.
यात त्यांचा थोडाही दोष नाही,दोष तर इथल्या गुलाम मानसिकतेचा आहे.
इथले सरकार जाणीवपूर्वक विदेशातून हजारो कोटी कर्ज घेऊन इथल्या उच्चभ्रू लोकांना भरभरून कर्ज देऊन थोड्याच दिवसात ते कर्ज माफ करतं.याचे कारण आपण समजून घेतले पाहिजे की,या देशाला विदेशातून पैसे घेऊन घेऊन गुलाम करायचे व मूठभर लोकांना तो पैसा घेऊन या देशाच्या बाहेर पाठवून द्यायचे. याचे अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत त्यामध्ये विजय माल्ल्या,निरव मोदी, ललित मोदी यासारखे अनेक उच्च जातीतील(?)आहेत.तसेच आत्ताचं एक खूप मोठं उदाहरण आहे सुभाष चंद्रा नावाच्या व्यक्तीचे 22 हजार कोटी रुपये कर्ज केवळ 6.5 कोटी रुपयांमध्ये माफ केला आहे.हा पैसा गोरगरिबाच्या कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा आहे तो मूठभर भांडवलदारांना दोन दोन हाताने वाटण्याचे काम इथले सत्ताधारी करत आहेत पण शेतकऱ्याचे मात्र लाख रुपयांचे कर्ज देखील माफ होत नाही कारण शेतकरी हा मूळनिवासी बहुजन समाजातील(क्षूद्र)आहे.परंतु आपण त्याच्यावर विचार करण्याची तसदीच घेत नाहीत.आपल्या देशामध्ये मुठभर ब्राम्हणवादी व भांडवलदार लोक हे या देशातील मूलनिवासी लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पकड मध्ये ठेवत आहे.ही पद्धत जनावरांपेक्षा देखील निचपतळीची आहे. म्हणून मान्यवर कांशीरामजी साहेब म्हणायचे,"तिलक तराजू और तलवार इनको मारो जूते चार!"
बांधवानो एक उदाहरण आहे की, "रावण हरला तो रामाच्या ताकदीने नाही तर बिभीषणाच्या फितूरीने हरला आहे".
यावरून आपण समजून घेतले पाहिजे की,हा देश वारंवार गुलाम होण्याचे कारण विदेशी नसून या देशांमध्ये पैदा झालेल्या बिभीषणाच्या फीतुरीने झाला आहे.
बांधवांनो अनेक दिवसानंतर आपल्यासमोर या छोट्याशा लेखाच्या माध्यमातून मला व्यक्त होता आले.यामध्ये काही चुकीचं वक्तव्य झालं असल्यास आपण दुरुस्ती करू शकता परंतु आपण जर आताही जागृत नाही झालं तर मात्र आपली येणारी पिढी ही पूर्णपणे गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही.म्हणून जनावरं स्वतःसाठीच जगतात आणि माणसं हे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आणि आपल्या पूर्वजांच्या जाज्वल्य इतिहासासाठी जगतात!
यात आपण ठरवू की,आपण माणसं आहेत की,जनावर?
*लेखन - प्रशांत वासनिक*
बीड.
संपर्क - *9881434001*

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत