Breaking News

डॉ. बिलाल शेख यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार जाहीर; कर्तव्य तत्पर्तेला कादरी फाउंडेशन कडून मानाचा मुजरा!

डॉ. बिलाल शेख यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार जाहीर

कर्तव्य तत्पर्तेला कादरी फाउंडेशन कडून मानाचा मुजरा!

बीड।एस.एम.न्युज़

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असलेले डॉक्टर बिलाल शेख यांना मानाचा आदर्श डॉक्टर पुरस्कार जाहीर झाल्याने वैद्यकीय क्षेत्रासह समाजातील विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
                 बीड शहरातील कादरी फाउंडेशन यावेळी प्रथमच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वांना राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविणार आहे. यात आदर्श डॉक्टर पुरस्कार २०२६ साठी त्यांनी जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर बिलाल शेख यांची निवड केली आहे.
                  डॉक्टर बिलाल शेख हे वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट आणि अविरत योगदान देत असून ते आयसीयू विभागात रात्रंदिवस उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक व सेवाभावी क्षेत्रात सुद्धा दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 'कादरी फाउंडेशन त्यांना राज्यस्तरीय गुणगौरव आदर्श डॉक्टर पुरस्कार २०२६ ने सन्मानित करणार आहे.
                हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रविवार रोजी सायंकाळी ६:३० वाजता हॉटेल गोल्डन चॉईस, बार्शी रोड, बीड येथे आयोजित करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बिलाल शेख यांना आदर्श डॉक्टर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत