Breaking News

पत्रकारांच्या हक्कांसाठी आणखी जोमाने लढणार - पठाण अमरजान नियुक्तीपत्र स्वीकारून पदभार; पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार!

पत्रकारांच्या हक्कांसाठी आणखी जोमाने लढणार - पठाण अमरजाननियुक्तीपत्र स्वीकारून पदभार; पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार!

बीड।एस.एम.न्युज़ - अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.       
       शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ़ पठाण आणि शेख वज़ीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला.
       पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.
       पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
             यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत