श्री. नारायण हायस्कूलचे गणिताचार्य शेख अशफाक अहेमद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
बीड।एस.एम.न्युज़
शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट, उल्लेखनीय आणि अविरत योगदानाची दखल घेत श्री. नारायण हायस्कूल, आहेरचिंचोली (ता. जि. बीड) येथील सहशिक्षक तथा गणिताचार्य अशफाक अहेमद क़य्यूम शेख यांना 'कादरी फाउंडेशन राज्यस्तरीय गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' ने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता हॉटेल गोल्डन चॉईस, बार्शी रोड, बीड येथे पार पडला.
अशफाक अहेमद क़य्यूम शेख यांनी गेल्या २२ वर्षांपासून गणित या क्लिष्ट मानल्या जाणाऱ्या विषयाचे अध्यापन अत्यंत सोप्या, रंजक आणि रसाळ पद्धतीने हाताळून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एम.एम.एस. (NMMS), स्कॉलरशिप परीक्षा आणि गणित संबोधी परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. आज त्यांचे अनेक विद्यार्थी अभियंता, (Engineer), डॉक्टर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे कुस्तीपटू म्हणून नावारूपास आले आहेत. यापूर्वीही त्यांना साप्ताहिक 'द स्कूल एक्सप्रेस चा आदर्श शिक्षक पुरस्कार' आणि 'डॉ. ज़ाकीर हुसेन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा