नेकनूरच्या कुस्तीपटूंचा तालुक्यात दणका! फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत अंडर-17 संघाचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक; शेख मुजेफ मुनवरची दमदार कामगिरी
नेकनूरच्या कुस्तीपटूंचा तालुक्यात दणका!
फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत अंडर-17 संघाचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक; शेख मुजेफ मुनवरची दमदार कामगिरी
नेकनूर।एस.एम.न्युज़ - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, नेकनूरच्या अंडर-17 संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार यशामुळे नेकनूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मैदानावर उतरलेल्या नेकनूरच्या कुस्तीपटूंनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि शिस्तीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. त्यांच्या आक्रमक खेळाचे आणि उत्कृष्ट तंत्राचे उपस्थितांनी कौतुक केले.
शेख मुजेफ मुनवरची उल्लेखनीय कामगिरी
इयत्ता दहावीतील विद्यार्थी शेख मुजेफ मुनवर याने स्पर्धेत विशेष चमक दाखवत आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या दमदार कामगिरीमुळे संघाच्या यशात मोलाची भर पडली. तसेच सय्यद उजेर हिदायत आणि कुरेशी हसनैन मुज़म्मिल यांनीही उत्कृष्ट झुंज देत स्पर्धेत सहभाग नोंदविला. मात्र, काही गुणांच्या फरकामुळे त्यांना पुढील फेरीत प्रवेश करता आला नाही. अल्प फरकाने संधी हुकली असली तरी दोन्ही खेळाडूंनी दाखवलेली जिद्द आणि मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे.
मार्गदर्शन आणि प्रशिक्षणामुळे यशाला बळ!
या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक युनूस अन्सारी आणि क्रीडा विभाग प्रमुख काज़ी मुशाहेद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कुस्तीपटूंना तांत्रिक व प्रत्यक्ष प्रशिक्षण वस्ताद इमरोज़ पहेलवान यांनी दिले.
तसेच मुस्ताईद आणि तौसिफ यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. शिक्षकवृंदातील काळे, ठोंबरे, सिद्दीक, मुस्तफा, फरहत बाजी, राजश्री मॅडम, भोसले आणि हुमेरा बाजी यांच्यासह सर्व केंद्र व तालुक्यातील शिक्षकांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
स्पर्धेदरम्यान प्रोत्साहनाची थाप!
स्पर्धेदरम्यान मौलाना आज़ाद सामाजिक फाउंडेशन, नेकनूरचे शहराध्यक्ष शेख सद्दाम शेख सकलेन यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. यावेळी इनायत शेख आजम यांचीही उपस्थिती होती. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत भविष्यात आणखी मोठे यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले.
शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही नेकनूरचा झेंडा!
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, नेकनूरच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तालुकास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत मिळविलेला प्रथम क्रमांक हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, प्रशिक्षकांच्या परिश्रमाचा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा गौरव आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा