Breaking News

अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पठाण अमरजान यांची पुनर्निवड

अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पठाण अमरजान यांची पुनर्निवडदहा वर्षांच्या पत्रकारितेतील सक्रिय योगदानाची दखल; पत्रकारांच्या हक्क, सन्मान व सुरक्षेसाठी लढा अधिक प्रभावी करण्याचा संकल्प!

बीड।एस.एम.न्युज़ - अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS) च्या बीड जिल्हाध्यक्षपदी येथील उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जिग्नेश पटेल (कालावडिया) यांच्या अनुमोदनाने त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.
         पठाण अमरजान आजम खान हे गेल्या दहा वर्षांपासून बीड जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
         पत्रकारांच्या समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान तसेच पत्रकारांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा संकल्प पठाण अमरजान यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्याचे काम या माध्यमातून केले जाणार आहे.
         “जिल्हाध्यक्षपद ही केवळ पदाची जबाबदारी नसून, पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याची बांधिलकी आहे. पत्रकारांच्या हक्क, सन्मान आणि सुरक्षेसाठी सदैव कार्यरत राहू,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
          पठाण अमरजान आजम खान यांच्या पुनर्निवडीबद्दल अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS) परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत