भाजपने भारतीय जनतेची सहनशक्ती वाढवली की जनता नेभळट झाली?
भाजपने भारतीय जनतेची सहनशक्ती वाढवली की जनता नेभळट झाली?
- एस.एम.युसूफ़आपल्या भारत देशाचे एकंदरीत वातावरण आणि त्याला सहन करत असलेल्या जनतेकडे पाहून भारतीय जनता पक्षाने भारतीय जनतेची सहनशक्ती वाढवली की जनता नेभळट झाली असा प्रश्न पडला आहे.
भारतीय जनता पक्ष २०१४ पूर्वी कधी आपल्या भारत देशात सत्तेवर आला नव्हता का? आला होता. २०१४ पूर्वी ही भारतीय जनता पक्ष अनेक वेळा देशात सत्तेवर आलेला आहे. याच पक्षाच्या मोरारजीभाई देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी सारखे उत्तुंग नेतृत्व असलेल्या नेत्यांनी देशाचे पंतप्रधान पद भूषविलेले आहे. मात्र तेव्हाच्या भारतीय जनता पक्षाची विचारसरणी, त्यांच्या नेत्यांचे नेतृत्व आणि आजच्या भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आणि नेतृत्वात कमालीचा बदल झालेला आहे. आणि बहुतांश भारतीय जनतेच्या मानसिकतेत सुद्धा फरक पडल्याचे दिसून येते.
सन २०१४ पूर्वी कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्या काळात जेव्हा-जेव्हा कोणत्याही वस्तूमागे नाम मात्र म्हणजेच रुपया-दोन रुपये जरी वाढ झाली तरी तेव्हा-तेव्हा विरोधी पक्षांसह आपली भारतीय जनता सुद्धा पेटून उठायची, रस्त्यावर यायची, मोर्चे, आंदोलने, करायची. सरकारवर तुटून पडायची. या सर्वाचा परिपाक असा व्हायचा की, महाग झालेल्या वस्तूंचे दर सरकारला पुन्हा पूर्व दरात आणावे लागायचे.
२०१४ नंतर मात्र वाढलेल्या महागाईवर ना तशी उग्रता विरोधी पक्षांकडे राहिली आहे. ना भारतीय जनता याचा कडाडून विरोध करते. म्हणूनच आजमीतीला स्वयंपाकाच्या गॅस चे दर आकाशाला भिडले आहेत. पेट्रोल ११५ ते १२५ रुपये लिटर, साखर ७० ते ८० रुपये किलो, गोडतेलांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार म्हणजेच करडी, शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन, सरकी रिफाइंड, पामोलीन वगैरे दरात तिप्पट ते चौपट दरवाढ झालेली आहे. २० ते ३० रुपये लिटर प्रमाणे मिळणारे दूध आता ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ०५ रुपयात मिळणारा कट चहा बघता-बघता १५ रुपयांवर गेला आहे. १० ते २०वीस रुपये किलो दराने मिळणारा कांदा ५० ते ६० रुपये किलो पर्यंत गेला आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण ही वाढत्या महागाईतून सुटलेले नाही. आज आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून चांगली शाळा व खाजगी शिकवणी वर्गात पाठवायचे म्हटले की, दरवर्षी एकेका विषयाकरिता हजारो रुपये पालकांना मोजावे लागत आहेत. जिथे २०१४ पूर्वी बहुतेक सरकारी शाळांमधून चांगले दर्जेदार व तेही विनामूल्य शिक्षण मिळायचे आज मात्र परिस्थिती बदलली आहे.
तरीही या सर्व परिस्थिती विरुद्ध जनहितास्तव पेटून उठणारे ना विरोधी पक्ष राहिलेत, ना भारतीय जनता. आता पूर्वीप्रमाणे चुकीच्या शासन धोरणा विरोधात, महागाईच्या विरोधात, रस्त्यावर उतरून भारतीय जनता एल्गार पुकारत नाही. २०१४ पूर्वी आपल्या याच भारत देशात चुकीचे शासन निर्णय आणि महागाई सहन न करणारी आणि याविरुद्ध पेटून उठणारी जनता आता मात्र सर्व काही निमुटपणे सहन करीत आहे. या मागची कारणे जी काही असेल ती असेल परंतु सर्वात मोठे कारण म्हणजे २०१४ पासून केंद्रात तसेच अनेक राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने भारतीय जनतेची सहनशक्ती वाढवली की जनता नेभळट झाली असा प्रश्न आता पडला आहे. कारण जनता आता चुकीच्या शासन निर्णयासह महागाई विरोधात पेटून उठत नाही, रस्त्यावर येत नाही, मोर्चे, आंदोलने करत नाही.
*लेखन - एस.एम.युसूफ़*
मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा