चंपावती क्रीडा मंडळ व यंग स्टार टेनिस अकॅडमी यांच्या संयूक्त विद्यमाने बीड मध्ये टेनिस स्पर्धा उत्साहात संपन्न
बीड।एस.एम.न्युज़ - शहरातील चंपावती क्रीडामंडळ व यंग स्टार टेनिस अकॅडमी यांच्या संयूक्त विद्यमाने बीड मध्ये प्रथमच टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन टेनिस प्रीमियर लीग रेस टू गोल्ड यांच्या देखरेखी खाली पार पडले.
दिनांक ७ व ८ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण मा. आ. अमरसिंह पंडित, जिल्हाधिकारी बीड विवेक जॉन्सन, पुणे आयकर आयुक्त विश्वास मुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्यागर, डॉ. बाळासाहेब गवते, महादेव धांडे, हनिफ़ बेग यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून विविध वयोगटातील मुलांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेसाठी लातूर, सोलापूर, नाशिक, संभाजीनगर, पुणे, नांदेड अशा विविध जिल्ह्यातून खेळाडू आले होते.
स्पर्धेत लहान मुले अंडर १०, अंडर १२, अंडर १४, अंडर १६ या वयोगटातील मुले व मुलींनी सहभाग नोंदवला. मुलांमध्ये विविध वयोगटात अंडर १० मध्ये चि. शौनक बडे हा विजेता ठरला व चि. हादी शेख ने व्दितीय क्रमांक पटकावला. अंडर १२ मध्ये चि. शिवप्रताप सुर्वे विजेता व अवनीश देशमूख याने व्दितीय क्रमांक पटकावला. अंडर १४ मध्ये शाश्वत कटके हा विजेता व चि. चैतन्य दगडखैर हा उपविजेता ठरला. अंडर १६ मध्ये चि. चैतन्य दगडखैर हा विजेता आणि विराज नाईकवाडे हा उपविजेता ठरला.
मुलींमध्ये विविध वयोगटात अंडर १० मध्ये कु. विदीशा मुंडे ही विजेता तर ईलिशा खंबायते नाशिक ही उपविजेता ठरली. अंडर १२ मध्ये कु. आर्या जाधव ही विजेता तर विदीशा मुंडे ही उपविजेती ठरली. अंडर १४ वयोगटात कु. आर्या जाधव विजेती तर मुनज्जा शेख ही उपविजेती ठरली. अंडर १६ मध्ये कु. क्रुतूजा सोनी विजेती व आर्या जाधव उपविजेती ठरली.
स्पर्धेचे आयोजन यंग स्टार टेनिस अकॅडमीचे प्रशिक्षक शेख अतिक़ यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रताप माने व आतिफ़ खान यांनी सहकार्य व परिश्रम घेतले.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा