सावधान! आपल्या मुला-मुलीचे लग्न करताय, तर हे वाचा ..... आई-वडिलांसह छपाई केंद्रे आणि विवाह सभागृहे यांच्यावरही होणार कारवाई
सावधान! आपल्या मुला-मुलीचे लग्न करताय, तर हे वाचा .....
आई-वडिलांसह छपाई केंद्रे आणि विवाह सभागृहे यांच्यावरही होणार कारवाई
मुंबई।एस.एम.न्युज़
लग्नाच्या पत्रिकांवर आता वधू-वराची जन्मतारीख नोंद करने अनिवार्य करण्यात आले आहे. पालन न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात छपाई केंद्रे आणि विवाह सभागृहे यांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार एक नवीन आणि कठोर प्रशासकीय उपाययोजना लागू करत आहे. याअंतर्गत, लग्नाच्या पत्रिकांवर आता वधू आणि वर यांची जन्मतारीख नोंद करने अनिवार्य असणार आहे. याचे पालन न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणात छपाई केंद्रे आणि विवाह सभागृहे यांनाही जबाबदार धरले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार हा नियम लागू करणार असून महाराष्ट्रातील बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक दुष्कृत्याला पूर्णपणे आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार हा नवीन आगळावेगळा नियम लागू करण्याची योजना आखत आहे. राज्यात अल्पवयीन विवाह सुरुवातीलाच रोखणे हा याचा उद्देश आहे.
याविषयी बोलताना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रशासन या नवीन नियमाला कायदेशीर स्वरूप देऊन त्याच्या अंमलबजावणीच्या व्यवहार्यतेची तपासणी करत आहे. सरकारचा विश्वास आहे की, या प्रणालीमुळे लग्नाच्या वेळी वधू आणि वराचे अचूक वय पडताळणे अधिक सोपे होणार आहे.
महाराष्ट्रातील फडणवीस सरकार राजस्थान मॉडेलच्या आधारावर हा नियम लागू करत आहे. या प्रणाली अंतर्गत जेव्हा एखादे कुटुंब लग्नाची पत्रिका छापण्यासाठी प्रिंटिंग प्रेसशी संपर्क साधेल, तेव्हा त्यांना वधू आणि वर दोघांचीही कायदेशीर वयाची प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक असेल. प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेली जन्मतारीख निमंत्रण पत्रिकेवर ठळकपणे दर्शवणे आवश्यक असणार आहे. यामुळे केवळ कुटुंबालाच नव्हे, तर लग्नाशी संबंधित नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनाही वधू आणि वराचे खरे वय कळू शकणार आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा