Breaking News

मुस्लिम संरक्षणाच्या नावाखाली स्वतःचे हित साधणाऱ्या स्वयंघोषित संघर्ष योद्ध्यांपासून सावध रहा - अखिल अण्णा, पठाण अमरजान

           मुस्लिम संरक्षणाच्या नावाखाली स्वतःचे हित          साधणाऱ्या स्वयंघोषित संघर्ष योद्ध्यांपासून सावध रहा - अखिल अण्णा, पठाण अमरजान

बीड।एस.एम.न्युज़ -  मुस्लिम समाजाच्या संरक्षणाच्या नावाखाली स्वतःचे राजकीय व आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या स्वयंघोषित संघर्ष योद्ध्यांपासून समाजाने सावध राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शेख अखिल अण्णा आणि पठाण अमरजान यांनी केले आहे.
          प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार त्यांनी म्हटले आहे की, बीड शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून काही स्वयंघोषित व्यक्ती मुस्लिम समाजाच्या संरक्षणाच्या नावाखाली बैठका घेऊन युवकांना भावनिकरीत्या प्रभावित करत आहेत. या बैठकींमध्ये युवकांच्या सह्या व छायाचित्रे गोळा करून त्यांचा वापर स्वतःची राजकीय प्रतिमा उभारण्यासाठी आणि आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
           तसेच समाजातील राजकीय नेते, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक बोलावली जाते; मात्र त्या बैठकीत वेगळे मत मांडणाऱ्यांची मते जाणीवपूर्वक डावलली जातात. इतकेच नव्हे तर, विरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्तींना नंतर समाजातील बैठका व उपक्रमांपासून दूर ठेवण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
          मुस्लिम समाजाच्या नावाने आंदोलने, उपोषणे व विविध कार्यक्रम आयोजित करून समाजाकडून पाठिंबा मिळवला जातो; मात्र त्या पाठिंब्याचा उपयोग समाजहितासाठी न करता वैयक्तिक राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी केला जातो. समाजाच्या प्रश्नांवर पारदर्शक भूमिका न घेता स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.याशिवाय, अशा प्रकारांबाबत कोणी जाब विचारला किंवा प्रश्न उपस्थित केला, तर संबंधित व्यक्तींवरच आरोप करून त्यांना सामाजिक चळवळीतून बाजूला करण्याचे प्रकार घडत असल्याचा दावाही त्यांनी केला.
          त्यामुळे मुस्लिम समाजाने कोणत्याही व्यक्तीच्या भावनिक आवाहनांना बळी न पडता, विचारपूर्वक निर्णय घ्यावेत आणि समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वालाच पाठिंबा द्यावा, आणि अशा स्वयंघोषित संघर्ष योद्धांपासून सावध राहावे असे आवाहन शेख अखिल अण्णा आणि पठाण अमरजान यांनी केले.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत