Breaking News

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचा, मराठवाडा विभागीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार संपादक समीर काझी यांना जाहीर


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचा, मराठवाडा विभागीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार संपादक समीर काझी यांना जाहीर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)।एस.एम.न्युज़ -

पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई अंतर्गत मराठवाडा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या "मराठवाडा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार – 2026" साठी बीड जिल्ह्यातील पत्रकार दै.बीड प्रसाराचे संपादक समीर काझी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
               महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या द्वितीय मराठवाडा भूषण सन्मान सोहळा – 2026 अंतर्गत हा पुरस्कार रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्याचे आयोजन पत्रकार संघाचे संस्थापक प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विभाग प्रमुख अनिल सावंत, तसेच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष छबुराव ताके, मुख्य संयोजक मधुकर अण्णा मुळे यांच्या आयोजनातून करण्यात येत आहे.
                हा सन्मान सोहळा रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे होणार असून, या वेळी दै.बीड प्रसारचे संपादक काझी समीरोद्दीन यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
             काझी समीरोद्दीन यांच्या या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या सन्मानाकडे पाहिले जात आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत