Breaking News

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा खाजगी बाजार तेजीत


जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा खाजगी बाजार तेजीत

आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा एकंदरीत वावर पाहता डॉक्टर्स आता निव्वळ व्यापारी झाल्याचे आणि त्यांनी थाटलेल्या खाजगी दवाखान्यांचा बाजार तेजीत आला आहे.
                 डॉक्टर्स ज्यांना रुग्णांसाठी ईश्वराचे रूप म्हटले जाते, त्यांच्यात आता फार मोठा बदल झालाय. याचा प्रत्यय जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग असो की आंतररुग्ण विभाग असो तिथे उपचार करण्यासाठी गेलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात येतोय. काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर स्वतःचे छोटेसे खाजगी क्लिनिक उघडून रुग्णांवर उपचार करायचे. तिथे शक्यतो प्रथमोपचारावर चांगले होऊ शकणाऱ्या रुग्णांवरच उपचार करायचे. इतर रुग्ण किंवा शस्त्रक्रिया करण्याच्या अवस्थेत असले तर त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करायचे परंतु आता मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वतःचे खाजगी क्लिनिक नाही तर मोठमोठे हॉस्पिटल उघडून बसले आहेत. जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असतानाच तेथील रुग्ण स्वतःच्या खाजगी दवाखान्यात पळवून नेत आहेत. एवढेच नव्हे तर काहींनी रूग्ण पळविताना आपण डोळ्यांवर येऊ नये म्हणून टापटीप राहणारे शर्टींग-शूटिंग करणारे एजंट म्हणजेच दलालांना सुद्धा कमिशनवर ठेवले आहे. असे दलाल जिल्हा रुग्णालयात स्वतः डॉक्टर असल्यासारखे वावरू लागले आहेत. त्यांचा टापटीप वावर पाहून ग्रामीण भागातील भोळ्याभाबड्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह शहरी भागातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक सुद्धा भुलतात आणि त्यांच्या नादी लागून ते संबंधित डॉक्टरांच्या खाजगी दवाखान्यात जातात. पूर्वीचे डॉक्टर्स रुग्ण कमीत कमी पैशांमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये चांगला ठणठणीत व्हावा या दृष्टीने त्याच्यावर उपचार करायचे परंतु आजकालचे डॉक्टर मात्र याच्या उलट आचरण करत असल्याने डॉक्टरांच्या आर्थिक तुंबड्या तर मोठ्या प्रमाणात भरल्या जात आहेत परंतु त्या भरताना त्यांच्याकडून उपचार घेणारे रुग्ण मात्र लुटले जात आहेत. त्यांना ओरबाडले जात आहे. या अवस्थेवर कितीही कायदे करा, कितीही कलमे लावा, काही एक उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक वगळता बहुतांश डॉक्टरांचे खाजगी हॉस्पिटल दिमाखदार इमारतींमध्ये सुरू आहेत. त्यांना हात घालून त्यांच्यावर कडक कारवाया करण्याचे धारिष्ट्य जिल्हा शल्यचिकित्सकांसह मोठमोठे उच्चपदस्थ अधिकारी असो की, शासन चालविणारे सत्ताधारी कोणीही दाखवीत नाहीत. एवढेच नव्हे तर विरोधी पक्ष सुद्धा गुळगुळीत झाले आहेत. ही बाब सुद्धा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी मारक ठरत आहे.

*लेखन - एस.एम.युसूफ़*
(मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार)

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत