Breaking News

गरजु व्यक्तींना मदत करणे, त्यांच्या हाकेला धावून जाणे हे माझ्या जिवनाचे ध्येय - डॉ. श्रावणी वेदपाठक

गरजु व्यक्तींना मदत करणे, त्यांच्या हाकेला धावून जाणे हे माझ्या जिवनाचे ध्येय - डॉ. श्रावणी वेदपाठक

बीड।एस.एम.न्युज़ - जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा देव तेथेची जानावा...... या संत वचनांची प्रेरणा घेऊन ईश्वर चराचरात वसलेला असून वयोवृद्ध व्यक्ती, गरजु व्यक्तींना मदत करणे, त्याच्या हाकेला धावून जाणे, त्यांना आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे माझ्या पुढील जिवनाचे ध्येय असून मी आजपर्यंत बीड शहरातील अनाथांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील गरजु लाभार्थ्यांच्या दाता संबंधित विविध समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असून पुढील काळातही अधिकाधिक रुग्णांना सर्व सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहील. माझ्या वैद्यकीय कार्यात आदित्य डेंटल कॉलेजच्या संचालिका श्रीमती आदिती सारडा मॅडम यांच्यासह सर्व प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले असून आदित्य डेंटल कॉलेज विद्यार्थिनी कु. डॉ. श्रावणी वेदपाठक यांनी दंत महाविद्यालयाची अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जिव्हाळा बेघर निवारा केंद्रामध्ये सर्व अनाथ बेघर ज्यांना कोणीही नाही अशा सर्वांना फळे वाटप करून सर्व लाभार्थ्यांचा आशीर्वाद घेतला.
            डॉ. श्रावणी ताईंनी चार वर्षांमध्ये जिव्हाळा केंद्रातील अनेकांच्या दाताच्या अडचणी दूर केल्या आणि अनेकांचे किडलेले दात मोफत काढून दिले.
चार वर्षांमध्ये प्रॅक्टिकल साठी अनेक जण डेंटल कॉलेजच्या मुलींना जिव्हाळा केंद्रातून मिळाले. त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या जिव्हाळा केंद्रामध्ये आज आल्या तेव्हा जिव्हाळा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत