Breaking News

विलासराव देशमुख - अब्दुल रहेमान अंतुले; उच्च कोटीचे तत्त्वशील राजकारण!

                  उच्च कोटीचे तत्त्वशील राजकारण!

             विलासराव देशमुख - अब्दुल रहेमान अंतुलेछोटासा किस्सा - अवश्य वाचा; संवेदनशील असताल तर डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही - एस.एम.युसूफ़

अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात
विलासरावांना मंत्रिपद न्हवतं. असं असताना विलासरावांनी अंतुलेचा लातूरमध्ये
सत्कार करायचं ठरवलं. त्यावेळी भाषणात विलासराव
म्हणाले "साहेब लातूरला मंत्रिपद नाही. पण आम्हाला लातूर जिल्हा तर द्या.
"अंतुले साहेब लगेच म्हणाले 'दिला'..!!
आणि लातूर जिल्हा निर्माण झाला,
पुढे विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर
जिल्ह्याचा २५ वा वर्धापनदिन साजरा करण्याचे ठरवले. आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
अंतुले साहेबांना बोलविण्याचे ठरविले...
त्यावेळी अंतुले साहेबांचा सत्कार करण्यात आला...
तेव्हा अंतुले भाषणात म्हणाले,"विलासराव एक जिल्हा
निर्माण करणं हे काही मोठं काम नाही,
मी तुम्हाला मंत्री केलं नसताना, फक्त लातूर जिल्हा निर्माण केला म्हणून मला आज बोलवले, माझा सत्कार केला. विलासराव राजकारणात २५ दिवस कोणी लक्षात
ठेवत नाही, तुम्ही २५ वर्ष मला विसरला नाहीत हो"...
आणि अंतुले साहेबांच्या डोळ्यात पाणी आले.
यावेळी विलासराव आणि अख्खी सभा हळहळली...
ही खिलाडू वृत्ती होती. त्यावेळी ही निष्ठा होती. त्यावेळी
नेते पदासाठी नाही तर विचार आणि लोकांसाठी राबत
होते. दुर्दैवाने आज परिस्थिती बदलली आहे आणि याची जागा द्वेष आणि नीच राजकारणाने घेतली आहे..
रोज वाटतं आज विलासराव आणि अंतुले सारखे नेते असते तर ही वेळ आलीच नसती...!!
(सोशल मीडिया वरून साभार - चला थोडंसं वाचूया ग्रुप)
सौजन्य - चाळक साहेब, सेवानिवृत्त अधिकारी, बीड नगरपरिषद, बीड.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत