Breaking News

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचे एक पाऊल पुढे; जिल्हा रुग्णालय येथे अधिकृत थांबा सुरू! बीड नगरपरिषद किंवा बी अँड सी ने थांब्यावर पत्र्याचे शेड उभारावे

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचे एक पाऊल पुढे; जिल्हा रुग्णालय येथे अधिकृत थांबा सुरू

बीड नगरपरिषद किंवा बी अँड सी ने थांब्यावर पत्र्याचे शेड उभारावे - एस.एम.युसूफ़

बीड।एस.एम.न्युज़

प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळावी म्हणून बीडच्या एसटी विभागाने एक पाऊल पुढे टाकत बार्शी रोडवर जिल्हा रुग्णालय आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे लगत अधिकृत बस थांबा सुरू केला आहे. येथे बार्शी रोड आणि तेलगाव रोड कडे जाणाऱ्या सर्व गाड्या थांबणार असल्याने उस्मानाबाद, सोलापूर, गुलबर्गा, परभणी यासारख्या मोठ्या शहरांसह अनेक तालुक्यात जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. यासाठी इथे एक वाहतूक नियंत्रकाची नेमणूक ही करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक सौ. अनुजा दुसाने यांनी हा थांबा कार्यान्वित करण्यासाठी विशेष कार्य केले आहे. आता ऊन, वारा, पाऊस यापासून प्रवाशांना त्रास होऊ नये याकरिता बीड नगरपरिषद किंवा बी अँड सी ने येथे पत्र्याचे शेड उभारणे गरजेचे आहे असे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.
                 याविषयी सविस्तर वृत्त असे की, बीड शहरात आता दूरदूर पर्यंत नागरी वसाहती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढलेल्या अंतरामुळे प्रवाशांना गावी जाताना एसटी बस स्थानकात जाऊन बस पकडण्यासाठी जास्तीचा वेळ आणि खर्च होत होता. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक सौ. अनुजा दुसाने यांनी प्रवाशांची सोय व्हावी याकरिता जिल्हा रुग्णालय आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे लगत बार्शी रोडवर अधिकृत बस थांबा सुरू केला आहे. येथे बार्शी रोड आणि तेलगाव रोड कडे जाणारी प्रत्येक एसटी बस थांबणार आहे. यासाठी इथे एक वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती ही करण्यात आली असून त्यांच्यासाठी एक पत्र्याचे कॅबिन सुद्धा ठेवण्यात आले आहे. येथून जाताना आता एकही बस इथे थांबा घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकले असून बसची वाट पाहत उभे राहिलेल्या प्रवाशांसाठी आता बीड नगर परिषदेने किंवा बी अँड सी ने येथे एक पत्र्याचे शेड उभारणे गरजेचे आहे. असे या थांब्याची पाहणी करताना एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले असून यावेळी एसटीचे सुरक्षा व दक्षता अधिकारी रणजीत यादव, वाहतूक नियंत्रक महेश भावसार आणि अनेक प्रवाशांची उपस्थिती होती.

बार्शी रोड नंतर अहेमदनगर रोडवर ही अधिकृत थांबा होणार - रणजीत यादव

बीड शहराची वाढलेली व्याप्ती लक्षात घेऊन एसटी महामंडळाने वेगवेगळ्या रस्त्यांवर विशेष थांब्यांचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने प्रथम बार्शी रोडवर थांबा केला असून लवकरच अहेमदनगर रोडवर बी अँड सी लगत थांबा बनवण्यात येणार आहे. यामुळे अहेमदनगर, पुणे, मुंबई सारख्या महानगरात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. अशी माहिती एसटीचे सुरक्षा व दक्षता अधिकारी रणजीत यादव यांनी दिली आहे.

जालना-औरंगाबाद रोडवर ही थांबा करणे आवश्यक - एस.एम.युसूफ़

बीड शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गापैकी एक असलेल्या जालना रोडवर सुद्धा अशाच प्रकारे मोंढा रोड टी पॉईंट वर अधिकृत एसटी बस थांबा करणे आवश्यक आहे. जालना, औरंगाबादहून बीड कडे येताना एसटी बस येथे प्रवासी सोडते परंतु बीडहून जालना-औरंगाबाद कडे जाणाऱ्या बसेस मात्र एकदा बस स्थानक सोडले की मध्ये कुठेही थांबून प्रवासी घेत नाहीत. यामुळे या परिसरातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे. ही बाब लक्षात घेता जालना रोडवर मोंढा टी पॉईंट येथे सुद्धा एसटी बस थांबा निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत