Breaking News

बीड नगर परिषद मध्ये प्रथमच त्रास मुक्त कर भरणा

 

बीड नगर परिषद मध्ये प्रथमच त्रास मुक्त कर भरणा

वसुली विभागात कर भरणाऱ्यांनी मानले आभार - एस.एम.युसूफ़

बीड।एस.एम.न्युज़

बीड नगरपरिषद च्या वसुली विभागात प्रथमच त्रासमुक्त कर भरणा केल्याचे समाधान मिळाले तसेच कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांमधून काहींनी आभार ही व्यक्त केल्याची माहिती एस.एम.युसूफ़ यांनी दिली.
                 याविषयी थोडक्यात वृत्त असे की, बीड नगर परिषदेच्या नवीन इमारतीची स्थापना झाल्यापासून अनेक वर्षे बीड शहरवासीयांना घरपट्टी, नळपट्टी सोबतच इतर कर भरण्याकरिता इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जावे लागत होते. तेव्हा पायऱ्या चढून जाताना वयोवृद्ध नागरिकांसह मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असलेल्या बीड शहरवासियांची दमछाक होत होती. ही बाब लक्षात घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांच्यासोबत मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन वसुली विभाग पहिल्या मजल्यावर हलविण्याची मागणी केली होती. तत्कालीन मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी या मागणीची नोंद घेऊन वसुली विभाग पहिल्या मजल्यावर हलविला. यामुळे कर भरणा करण्यासाठी येणाऱ्या बीड शहरवासीयांना होणारा मोठा त्रास कमी झाला आहे. आज कर भरणा करण्यासाठी गेलो असता कमी झालेल्या त्रासामुळे समाधान वाटले. शिवाय तिथे कर भरणा करण्यासाठी आलेल्यांपैकी काही जणांनी वसूली विभाग हलविण्याकरिता केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार ही व्यक्त केले. अशी माहिती एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिली आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत