संपूर्ण महाराष्ट्रातील मोकाट कुत्रे पूर्वमंत्री मनेका गांधी यांच्या निवासस्थानी नेऊन सोडा पत्रकार रणरागिणी आयेशा शेख यांच्यासह महिलांचे शासनाला साकडे
संपूर्ण महाराष्ट्रातील मोकाट कुत्रे पूर्वमंत्री मनेका गांधी यांच्या निवासस्थानी नेऊन सोडा
पत्रकार रणरागिणी आयेशा शेख यांच्यासह महिलांचे शासनाला साकडेबीड।एस.एम.युसूफ़
संपूर्ण महाराष्ट्रभरातील मोकाट कुत्रे जमा करून पूर्वमंत्री मनेका गांधी यांच्या दिल्ली स्थित निवासस्थानी नेऊन सोडा असे साकडे पत्रकार रणरागिणी असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या महिला जिल्हाध्यक्षा तथा आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा आयशा शेख यांच्यासह महिलांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, विभागीय आयुक्त यांना घातले आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, केंद्र सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदी असताना पूर्वमंत्री मनेका गांधी यांनी मानवाला अत्यंत त्रासदायक असा कायदा करून कुत्र्यांना अभय देणारा कायदा करून ठेवला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करताना शासकीय व प्रशासकीय स्तरावर मोकाट कुत्र्यांच्या वावरण्यावर कोणतीही प्रतिबंधित प्रक्रिया केली जात नाहीये.
शासकीय-प्रशासकीय पातळीवर मोकाट कुत्र्यांविषयी मोठ्या प्रमाणात उदासीनता आल्याने गेल्या काही वर्षात मोकाट कुत्र्यांची संख्या मानवापेक्षा जास्त जलद गतीने वाढत आहे. शिवाय प्रचंड संख्येने वाढलेले मोकाट कुत्र्यांचे कळपच्या कळप गल्लीबोळासह मुख्य रस्ते आणि महामार्गांवर सुद्धा मोठ्या संख्येने २४तास फिरत असल्याचे सहज दिसून येतात आणि रस्त्याने चालणाऱ्या पादचारीसह सायकल, दुचाकी, तीन चाकी च्या मागे भुंकत पळू लागले असून अनेक वेळा ते लहान मुला-मुलींपासून ते वयोवृद्धांपर्यंत माणसांवर हल्ले करू लागले आहेत.
आतापर्यंत अशा प्रकारे अनेकांवर मोकाट कुत्र्यांचे हल्ले झालेले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचे परिणाम म्हणून आतापर्यंत अनेक जण जखमी झाले असून काही जणांच्या प्राणांवर सुद्धा बेतलेले आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या कमी व्हावी म्हणून त्यांच्या वाढणाऱ्या संख्येवर अंकुश लावणे अत्यंत गरजेचे व आवश्यक झाले आहे. मात्र असे होताना दिसत नसल्याने कुत्र्यांविषयी कायदा करणाऱ्या पूर्व मंत्री मनेका गांधी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कुत्रे जमा करून पूर्ण बंदोबस्तात सोडावे.
तेव्हाच एकतर मोकाट कुत्र्यांच्या कायद्यात बदल होईल किंवा त्यांच्या वाढणाऱ्या संख्येत कमतरता येईल असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन देताना पत्रकार आयशा शेख यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई वाघमारे, पत्रकार सागरताई इचके आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा