बीड नगरपालिकेवर सत्ता कोणाचीही असो विकासाची बोंबाबोंब आश्वासनं नको प्रत्यक्ष विकास दाखवा - रूपाली देशपांडे
बीड नगरपालिकेवर सत्ता कोणाचीही असो विकासाची बोंबाबोंब
आश्वासनं नको प्रत्यक्ष विकास दाखवा - रूपाली देशपांडे
बीड।एस.एम.न्युज़ - बीड नगरपालिकेवर सत्ता कुणाचीही असो पण विकासाच्या नावाने नेहमी बोंबाबोंबच असते असा घनाघाती आरोप तडफदार सामाजिक कार्यकर्त्या रूपाली देशपांडे यांनी केला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, ही काही आजची परिस्थिती नाही. सत्ताधारी बदलले, अधिकारी बदलले, प्रशासन बदलले; मात्र बीडच्या विकासाचे चित्र आजही बदललेले नाही.
विकासाच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण आणि मूलभूत सुविधांची अवस्था पाहता हा विकास नेमका कुठे झाला, असा प्रश्न प्रत्येक बीडकराच्या मनात आहे.
शहराच्या विकासासाठी वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. विविध विकासकामांची घोषणा झाली, भूमिपूजन झाले, उद्घाटने झाली; पण त्या निधीचा प्रत्यक्ष लाभ सामान्य नागरिकांपर्यंत किती पोहोचला? याचा स्पष्ट आणि पारदर्शक हिशोब आजही जनतेसमोर आलेला नाही.
बीडच्या रस्त्यांची अवस्था संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले, अनेकांनी जीव गमावला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. पाणीटंचाई हा तर बीडकरांच्या नशिबी कायमचा आलेला प्रश्न बनला आहे. वर्षानुवर्षे तोच संघर्ष, तीच आश्वासने आणि तीच प्रतीक्षा.
अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाई होते; मात्र ती सर्वांवर समान निकषाने होते का? हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सामान्य माणसावर नियमांचा बडगा, पण प्रभावशाली लोकांबाबत वेगळे निकष दिसतात, अशी भावना जनतेत आहे.
दुसरीकडे घरपट्टी, नळपट्टी आणि इतर करांची वसुली मात्र अत्यंत कडकपणे केली जाते. नागरिकांनी एक दिवस उशीर केला तरी दंड; पण प्रशासनाने वर्षानुवर्षे रखडवलेल्या कामांचा जाब कोण विचारणार?
काही नागरिकांकडून पावती नसल्यास पुन्हा वसुली झाल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
मागील काही वर्षानुवर्षे नगरपालिकेला मिळालेल्या प्रत्येक रुपयाचा सार्वजनिक लेखाजोखा जाहीर व्हावा. कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर झाला? किती खर्च झाला? कामांची गुणवत्ता काय आहे? आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना झाला का? याची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. गैरव्यवहार झाला असेल, तर संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे.
जनतेचा पैसा हा कोणाच्याही मालकीचा नाही. तो जनतेच्या विकासासाठी आहे. त्यामुळे आता घोषणा नकोत... हिशोब द्या. आश्वासने नकोत... उत्तर द्या. कागदावरील विकास नको... बीडकरांना प्रत्यक्ष विकास दाखवा. असे खणखणीत आवाहन तडफदार सामाजिक कार्यकर्त्या रूपाली देशपांडे यांनी केले आहे.
👇👇👇👇👇
*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा