Breaking News

दुर्लक्ष! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची फरशी निखळली बीड नगर परिषद ला रंगबिरंगी कारंज्यांचाही विसर - रमेशराव गंगाधरे, एस.एम.युसूफ़

दुर्लक्ष! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची फरशी निखळलीबीड नगर परिषद ला रंगबिरंगी कारंज्यांचाही विसर - रमेशराव गंगाधरे, एस.एम.युसूफ़

बीड।एस.एम.न्युज़

शहराची ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची फरशी निखळली आहे मात्र याकडे बीड नगर परिषदेचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. तसेच पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाकरिता लावण्यात आलेले नयनरम्य रंगबिरंगी लाइट्स आणि पाण्याचे कारंजे सुद्धा बऱ्याच काळापासून बंद असल्याने याचाही बीड नगरपरिषदेला विसर पडला आहे. असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि एस.एम. न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.
                  याविषयी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, संपूर्ण भारतात कुठेही नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ देखना पुतळा आपल्या बीड शहरात आहे. त्याची निगा राखणे हे स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने बीड नगर परिषदेचे कर्तव्य आहे. ज्या स्तंभावर पुतळा उभा आहे त्या स्तंभाची फरशी निखळली आहे. त्यामुळे गालबोट लागले आहे. जर वेळीच लक्ष दिले नाही तर अन्य फरशाही निखळून पडू शकतात. निखळलेल्या जागी फरशी लावण्याची आवश्यकता आहे.
                  तसेच बऱ्याच काळापासून पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेले रंगबिरंगी लाइट्स आणि पाण्याचे कारंजे बंद अवस्थेत आहेत. ते दररोज कमीत कमी संध्याकाळी ०७:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत चालू करायला हवे. ज्यामुळे पुतळा परिसराची विहंगमता वाढते.
                 ही बाब लक्षात घेऊन बीड नगर परिषदेला अनेकदा निवेदनेही दिलेली आहेत परंतु त्यावर बीड नगरपालिका प्रशासनाकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून आवश्यक ते कार्य होत नाही. हे अत्यंत खिन्न मनाने म्हणावे लागत असल्याचे उद्विग्न मत रमेशराव गंगाधरे आणि एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत