Breaking News

वाचकाचे प्रेम! दिसताक्षणी गळा भेट घेत नाश्त्याचा आग्रह जामखेडचे अख़ील शेख; एक दर्दी वाचक!

वाचकाचे प्रेम! दिसताक्षणी गळा भेट घेत नाश्त्याचा आग्रह

           जामखेडचे अख़ील शेख; एक दर्दी वाचक!

बीड।एस.एम.न्युज़

गेल्या काही वर्षांपासून भलेही अनेक लोक म्हणत असतील की, सोशल मीडियामुळे वृत्तपत्र वाचकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली. मात्र आजही वृत्तपत्रांचे अनेक दर्दीवाचक आहेत. अशाच वाचकांमध्ये जामखेड येथील झैन-हुर परफ्यूम चे मालक/संचालक अख़ील शेख हेही एक होय. ते भलेही अहेमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याचे रहिवासी असले तरी बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणारी वृत्तपत्रे सुद्धा आवर्जून वाचतात.
               एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी लिहिलेल्या बातम्या असो की लेख ते न चुकता वाचतात. नुकतेच एस.एम.युसूफ़ हे अहेमदनगरहून बीडकडे प्रवास करत असताना अख़ील शेख यांनी त्यांची जामखेड बस स्थानकात आवर्जून भेट घेतली आणि नाश्ता करण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहाखातर एस.एम.युसूफ़ यांनी जामखेड येथे नाष्टा केला. अख़ील शेख यांनी यादरम्यान वृत्तपत्र आणि पत्रकारितेविषयी एस.एम.युसूफ़ यांच्याशी मनसोक्त चर्चा केली.
                या प्रसंगामुळे हे दिसून आले की, भले कितीही सोशल मीडियाचा जमाना येवो वृत्तपत्राच्या शाश्वततेला पर्याय नाही. वृत्तपत्रांमुळेच एका जिल्ह्यात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला दुसऱ्या जिल्ह्यातील वाचक वाचतात, अनुभवतात. स्पष्ट व खऱ्या लेखणीला मान देतात. ज्यामुळे दोघांचा संपर्क झाल्यास एकमेकांविषयी आपुलकी व प्रेम वाढते. याचाच प्रत्यय जामखेड येथे एस.एम.युसूफ़ आणि अख़ील शेख यांच्या भेटीदरम्यान आला.
👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत