Breaking News

नामांकित हमदर्द कंपनीकडून औषधींची बेदर्द भाव वाढ; पन्नास टक्क्यांनी वाढलेल्या भावामुळे रुग्णांचे कंबरडे मोडणार

नामांकित हमदर्द कंपनीकडून औषधींची बेदर्द भाव वाढपन्नास टक्क्यांनी वाढलेल्या भावामुळे रुग्णांचे कंबरडे मोडणार

बीड।एस.एम.न्युज़
देशातील नामांकित कंपनी हमदर्द ने औषधींच्या भावात बेदर्दपणे भाव वाढ केली आहे. पन्नास टक्क्यांनी वाढविण्यात आलेल्या भावामुळे रुग्णांचे कंबरडे मोडणार असून कंपनीने वाढीव दराचा फेरविचार करून माफक दर ठेवावे असे आवाहन एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.
                 याविषयी सविस्तर वृत्त असे की, आपल्या भारत देशात दर्जेदार औषधी तयार करणारी कंपनी म्हणून हमदर्द कंपनीला ओळखले जाते. पुर्वी या कंपनीकडून निर्माण होणाऱ्या औषधी, गोळ्या रूग्णांना वाजवी दरात मिळायचे. पण अलीकडच्या काळात गेल्या काही वर्षांपासून हमदर्द कंपनीकडून तयार होणाऱ्या औषधी-गोळ्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, नॅचरोपॅथी चे डॉक्टर्स रुग्णांना मोठ्या प्रमाणात लिहून देत असल्याने बाजारपेठेत नेहमी हमदर्द कंपनी च्या औषधी-गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. बहुतेक या तुटवड्याचीच नोंद घेऊन की काय कंपनीने गोळ्यांच्या दरात चक्क पन्नास टक्क्यांनी वाढ केली आहे. ख़ुर्स कुश्ता मरजन जवाहर वाला या वीस छोट्या गोळ्या असलेल्या एका छोट्याशा बाटलीची किंमत जी सहा महिन्यापूर्वी ७० रुपये होती, ती आता चक्क १०० रुपये करून टाकली आहे. ही गोळी हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी परिणामकारक असल्याने तिचा बाजारपेठेत नेहमी तुटवडा असतो. यामुळे या गोळीचे सेवन करणारे रुग्ण अगोदरच मेटाकुटीला येतात. त्यात पुन्हा आता याचे दर चक्क पन्नास टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. यामुळे रुग्णांचे कंबरडे मोडणार आहे. याचा विचार करून कंपनीने सर्व औषध-गोळ्यांचे दर माफक ठेवावेत. असे आवाहन एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत