कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाने पार केले पुरस्कारांचे शतक, उत्कृष्ट भूमिकेसाठी अभिनेते अनिकेत विश्वासराव यांना बेस्ट एक्टर अवॉर्ड चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी स्वीकारला पुरस्कार
कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाने पार केले पुरस्कारांचे शतक
उत्कृष्ट भूमिकेसाठी अभिनेते अनिकेत विश्वासराव यांना बेस्ट एक्टर अवॉर्ड
चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी स्वीकारला पुरस्कार
मुंबई।एस.एम.न्युज़
महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्व आमदार व मंत्री राहिलेले दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अनिकेत विश्वासराव पाटील यांना बेस्ट एक्टर अवॉर्ड देण्यात आला परंतु आगामी चित्रपटातील कामाच्या व्यस्ततेमुळे ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या अनुपस्थितीत चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत या चित्रपटावर असंख्य पुरस्कारांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. दिनांक १५ मे २०२६ शुक्रवार रोजी या चित्रपटातील भूमिकेसाठी अनिकेत विश्वासराव पाटील यांनाही बेस्ट एक्टर अवॉर्ड मिळाल्याने दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या विषयांमुळे आणि दमदार दिग्दर्शनामुळे ओळख निर्माण करणारे लेखक-दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या यशात आणखी एका मानाच्या पुरस्काराची भर पडली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटाला मुंबईतील पी.व्ही.आर. सिनेमा, जुहू येथे पार पडलेल्या ‘सिने ड्रीम्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल - सीझन २’ मध्ये प्रतिष्ठेचा ‘बेस्ट ऍक्टर एवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
या भव्य फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील दोन हजारांहून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदविला होता. अशा स्पर्धात्मक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मंचावर ‘कर्मयोगी आबासाहेब’ सिनेमाने पुरस्कार पटकावत आपली वेगळी छाप सोडली आहे. हा मानाचा पुरस्कार बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अय्युब खान आणि शाहबाज खान यांच्या हस्ते लेखक-दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी स्वीकारला.
या पुरस्कार सोहळ्यावेळी ससून हॉस्पिटलचे डॉ. तथा अभिनेते संजय उदावंत आणि युवा नेते स्वप्निल बारशिंगे यांची विशेष उपस्थिती होती. पुरस्कार स्वीकारताना अल्ताफ शेख यांनी भविष्यातही प्रेक्षकांना आशयघन, प्रेरणादायी आणि लक्षवेधी विषयांवरील दमदार चित्रपट देण्याचा मानस व्यक्त केला. ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटावर फक्त पुरस्कारांचा वर्षाव होतोय असे नाही, तर बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सलग पाच आठवडे दमदार कलेक्शन करत प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आहे.
लेखक-दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. त्यांच्या या यशामागे असलेली जिद्द, सातत्य, मेहनत, कल्पकता आणि टीमवर्क हेच खरे सामर्थ्य असल्याचे मत व्यक्त करत एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अमजदखान शेख, विशाल धेंडे, अभिनेते अली शेख, ऋषिकेश तायवाडे यांनी अल्ताफ शेख यांचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा