Breaking News

सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या, एनटीए संस्था रद्द करा

सामाजिक कार्यकर्त्यांची मागणीशिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या, एनटीए संस्था रद्द करा  

बीड (एस.एम.न्युज़) - वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट यूजी परीक्षेतील पेपर फुटी व गैर व्यवहारामुळे नीट यूजी परीक्षा नुकतीच केंद्र सरकारने रद्द केली आहे. नीट परीक्षा रविवार 21 जून 2026 रोजी घेण्याची आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केली आहे. नीटची परीक्षा रद्द झाल्याने व पुढे ढकलण्यात आल्या मुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले असून देशात अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची उघडकीस येत आहे. यापूर्वी देखील नीटचा पेपर फुटला होता. परंतु पेपर फुटी मध्ये प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कोणतीही कडक कारवाई केल्याचे दिसून आले नाही. पेपर फुटी,गैरव्यवहार बाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा तसेच एनटीए संस्था रद्द करून एनटीए चे महासंचालक अभिषेक सिंह यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा, परीक्षेसाठी स्वातंत्र्य महामंडळाची स्थापना करण्यात यावी, मानवी हस्तक्षेप कमीत कमी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन परीक्षा जिल्हा नीहाय सरकारी आवारात घेण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत दि. 15 मे 2026 शुक्रवार रोजी पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, डॉ.संजय तांदळे बाजीराव ढाकणे, प्रा. डी.जी.तांदळे, शेख युनूस, रामनाथ खोड, सय्यद सादेक, रामधन जमाले आदींची उपस्थिती होती.

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत