सायं.दैनिक जननेता ची सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ही घारीची नजर
सायं.दैनिक जननेता ची सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ही घारीची नजर
रात्रभरच्या पहाऱ्यामुळे शांत झोप पण ५० रुपयांना ना!
बीड - शहरातील धानोरा रोड परिसर मागच्या वर्षी याच दिवसांत चोऱ्यांच्या घटनांनी धास्तावलेला होता. काही घटना आणि त्यामुळे अफवांमुळे नागरिक रात्र जागून काढत. गस्त घालण्यासाठी पोलिसांची जीप अधुन मधून येई. तरीही नागरिकांचे जत्थेही जागून पहारा देत. आता मात्र मध्यरात्रीनंतर गल्लीगल्लीत शिट्टीचा आवाज घुमतो, काठीची टिकटिक ऐकू येते आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळतो. कारण या भागात शेरु कवर योगी, हे गोरखा रात्री पहारा देत असतात. नेपाळच्या रुकम जिल्ह्यातील शेरु योगी गेल्या १० महिन्यांपासून बीडमध्ये रखवालदारी करतात. रात्री साडेबारा वाजल्यापासून पहाटेपर्यंत ते तब्बल १५०० घरांच्या परिसरात गस्त घालतात. चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये त्यांच्या गस्तीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. पण विडंबना अशी की, महिनाभर आपल्या दारात शिट्टी वाजवून काठी आपटणाऱ्याला ५० रुपये देताना काहींची ना असते. कसेबसे महिन्याला त्यांना १० ते १२ हजार रुपये मिळतात. १९९८ पासून महाराष्ट्रातील विविध शहरांत रखवालदारी करणाऱ्या शेरु योगी यांच्यावर पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुन आणि नातवंडांचा मोठा परिवार आहे. स्वतःचा उदरनिर्वाह, गावाकडचा खर्च आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांची होणारी कसरत समजून घेण्यापेक्षा आपल्याला काहीसा मिळणारा दिलासा तरी समजून घ्यावा.
*साभार - सायं.दैनिक जननेता*
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा