Breaking News

सायं.दैनिक किसान ची वाटचाल एकमेवाद्वितीय - रमेशराव गंगाधरे

 

सायं.दैनिक किसान ची वाटचाल एकमेवाद्वितीय - रमेशराव गंगाधरे

बीड।एस.एम.न्युज़

दिनांक ५ मे रोजी सायं. दैनिक किसान चा ५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शुभेच्छा देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी वरील उद्गार काढले.
                 वृत्तपत्र क्षेत्र हे अत्यंत धकाधकीचे आणि डबघाईचे क्षेत्र झाले आहे. त्यातही आपल्या भारत देशात कुठे नसतील एवढ्या मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यात वृत्तपत्रे निघतात. यामुळे आता बीड जिल्ह्यात नवीन वृत्तपत्र काढणे हे अत्यंत जोखमीचे व जिकिरीचे झाले आहे. असे असूनही कामरान शेख या तरुणाने पाच वर्षांपूर्वी किसान या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली आणि बघता बघता गेल्या पाच वर्षात फक्त बीड जिल्हाच नाही तर राज्यात एक अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. यामागे जेमतेम २८ वर्षीय तरुण तडफदार संपादक कामरान शेख यांचा वृत्तपत्र चालविण्याचा दृष्टिकोन जसा कारणीभूत आहे, तसाच त्यांना त्यांचे  वडील आर.एम. डेव्हलपर्सचे संचालक राजू शेख आणि रेहान शेख व फरहान शेख या दोन्ही भावांची मिळत असलेली साथ ही तेवढीच तोलामोलाची आहे. म्हणूनच इतर वृत्तपत्रे जिथे ५०वर्षात जेवढे नाव कमवित नाही तेवढे सायं. दैनिक किसानने अवघ्या पाच वर्षात कमविले आहे. यापुढेही दैनिक किसान ची वाटचाल अशाच प्रकारे उत्तरोत्तर वाढत राहो. अशा अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ फार्मासिस्ट ॲड. जगन्नाथराव पवळ आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत