मातृभूमी प्रतिष्ठानकडून संपादक कामरान शेख यांना पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान
बीड (एस.एम.न्युज़) - सायं. दैनिक किसान च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने दिनांक ५ मे २०२६ मंगळवार रोजी बशीरगंज येथील सायं. दै. किसानच्या नूतन कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य संपादक कामरान शेख यांना मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जिल्ह्यातील पहिली नोंद असलेले व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांच्या हस्ते पत्रकार रत्न पुरस्काराने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, लेक लाडकी अभियानचे अध्यक्ष बाजीराव ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीणकुमार पालीमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा