खरमरीत; मिंधी जनता-भूषण भारता
खरमरीत; मिंधी जनता-भूषण भारता
पेट्रोल-डिझेल टंचाईवर एकही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही
दारू-मटनच्या बदल्यात मत आणि नंतर रांगेत तुमचंच आयुष्य..
नेते निवडले पार्टीवर आता उभे रहा पेट्रोल-गॅसच्या लाईनवर..
व्हीआयपींना नाही रांगा, जनतेला मात्र रोजची शिक्षा..
मत विकलं क्षणिक सुखासाठी आता सहन करा रोजचा संघर्ष..
दारू-चिकनच्या आमिषात दिलेलं मत, आज बनलं जनतेचं दुःख..
नेते एसीमध्ये, जनता रांगेत हीच का लोकशाही ?..
पार्टी घेतली, मत दिलं आता रांगेत उभं राहणं भाग..
नेते कधी दिसले का लाईनमध्ये ? मग आपणच का नेहमी त्रासात ?..
मतदारांनी घेतली पार्टी आता भरतोय त्याची किंमत..
सत्ताधारी मजेत, सामान्य जनता संकटात..
मग सांगा ही चूक कुणाची ?
पेट्रोलच्या रांगेतल्या मतदारा नेता कुठंय तुझा!
बीड जिल्ह्यात गॅस-पेट्रोल तुटवड्याने जनतेचा संताप उसळला!
बीड (प्रतिनिधी): बीड शहर आणि जिल्ह्यात सध्या गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पेट्रोल पंपावर चार-चार, पाच-पाच किलोमीटरच्या रांगा, गॅस एजन्सीसमोर तासनतास थांबलेले नागरिक. हे चित्र आता रोजचे झाले आहे. मात्र या रांगांमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते इथे फक्त सर्वसामान्य माणूसच दिसतो, व्हीआयपी नाही. हातावर पोट असलेले रिक्षाचालक, टेम्पो चालक, चहाचे स्टॉल लावणारे, वडापाव विक्रेते, छोटे-मोठे व्यापारी आणि कष्टकरी शेतमजूर. हेच लोक आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रांगेत उभे राहुन संघर्ष करत आहेत. गॅस मिळत नसल्यामुळे अनेक छोट्या व्यवसायांवर टाळे लागण्याची वेळ आली आहे. चायनीज गाड्या, खानावळी, चहाचे स्टॉल यांची चाके थांबण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आर्थिक संकट इतके तीव्र झाले आहे की, अनेक कुटुंबे जगण्यासठी तारेवरची कसरत करत आहेत. या उलट, सत्ता आणि विरोधी पक्षातील आमदार, खासदार, मंत्री किंवा धनाढ्य लोक हे कुठेच रांगांमध्ये दिसत नाहीत, नोटबंदीच्या काळातही हेच चित्र होते आणि आजही आहे. कारण त्यांच्या घरापर्यंत सर्व सुविधा सहज पोहोचतात. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रामुळे सामान्य माणूस मात्र कायमच पिचला जातो. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी कुठे आहेत? नगरसेवक असोत किंवा विविध संघटनांचे नेते, जनतेच्या या मूलभूत समस्येकडे ते ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. नागरिकांच्या अडचणींवर उपाय शोधण्याऐवजी अनेक जण स्वतःच्या कार्यक्रमात, सुट्ट्यांमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात व्यस्त असल्याचे दिसते. आज परिस्थिती अशी आहे की, जर वेळेवर उपाययोजना झाल्या नाहीत, तर केवळ आर्थिकच नव्हे तर कौटुंबिक आणि सामाजिक संकटही गडद होऊ शकते. त्यामुळे आता नागरिकांनी शांत पण ठाम पद्धतीने आपला आवाज उठवण्याची गरज आहे. प्रश्न विचारणे, जबाबदारी मागणे आणि लोकशाही मार्गाने दबाव निर्माण करणे हीच खरी ताकद आहे. ही वेळ आहे विचार करण्याची. आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी खरंच आपल्या समस्या सोडवल्या का? आणि नाही तर पुढच्या वेळी निर्णय घेताना आपण काय करणार?
मत विकणारे तुम्ही, तुमची हीच अवकात आहे. दारू मटणावर आणि पैशावर मत विकल्यामुळे तुम्हाला गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल यासाठी लाईनीत तडफडून मरावेच लागेल. कोणताही लोकप्रतिनिधी तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाही. कारण तुम्ही फुकट मत केलं नाही, पैशावर मतदान विकलं आहे. लोकप्रतिनिधीवर दैनिक जननेता चा रोष नाही. परंतु लोकप्रतिनिधी ज्या सभागृहात बसतात मग ते विधानसभा असो किंवा विधान परिषद असो किंवा लोकसभा असो हे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न उपस्थित करण्याचे न्याय मंदिर आहे. कोणताही आमदार, खासदार, मंत्री आणि विरोधातील व्यक्ती जिल्ह्यातील आणि या महाराष्ट्रातील गॅस डिझेल पेट्रोल यासह वाढत चाललेल्या बेरोजगारीवर कुणीही बोलायला तयार नाही. कारण तुम्ही पैशावर मत विकले आहेत तुम्ही ते आमदार खासदार मंत्री यांचे मिंदे आहात तुम्हाला नाक नाही.
साभार - सायं.दैनिक जननेता
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा