माजलगावात विकासाच्या नावाखाली उघड ‘डाका’सुवर्ण जयंती योजना की भ्रष्टाचाराचा बाजार?- नवीदोद्दीन सिद्दिकी
माजलगावात विकासाच्या नावाखाली उघड ‘डाका’
सुवर्ण जयंती योजना की भ्रष्टाचाराचा बाजार?- नवीदोद्दीन सिद्दिकी
माजलगाव (एस.एम.न्युज़) - नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या ‘सुवर्ण जयंती नगरोत्थान’ योजनेतील कामांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याचा आरोप होत आहे. अभियंता, मुख्याधिकारी आणि गुत्तेदार यांनी राजकीय पाठबळाच्या जोरावर शहराच्या विकासाऐवजी जनतेच्या पैशांची उघड लूट सुरू केल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
मनूर रोड व नवीन कब्रस्तान रोडवरील कामे म्हणजे निकृष्ट दर्जाचा नमुना ठरत आहेत. रस्ते बांधून काही दिवसही होत नाहीत तोच तडे, चिरे आणि उखडलेले काँक्रीट दिसू लागले आहे. भर उन्हाळ्यात पाणी न मारता केलेल्या कामांमुळे रस्ते अक्षरशः फसले असून, “काम पूर्ण की फक्त बिल पूर्ण?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
गटारी व नाल्यांची अवस्था तर आणखीनच बिकट झाली आहे. तुटक, वाकडी-तिकडी आणि अर्धवट कामे उघडपणे केली जात आहेत. सिमेंटमध्ये भेसळ, वाळू ऐवजी डस्ट-पावडर, निकृष्ट खडी, सगळे नियम धाब्यावर बसवून काम केल्याने संपूर्ण प्रकल्पच संशयाच्या भोवऱ्यात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्याचे व्हिडिओ पुरावे समोर येऊनही संबंधित अधिकारी व पदाधिकारी गप्प असल्याने “वरपर्यंत साखळी आहे का?” असा प्रश्न शहरभर चर्चेत आहे. नगरसेवक व नगराध्यक्ष यांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप उफाळून आला आहे.
या कामांची तात्काळ थर्ड पार्टी चौकशी, काँक्रीट क्यूब टेस्ट, तसेच सिमेंट, वाळू, खडी यांचे गुणवत्ता अहवाल जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. दोषींवर कडक कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा समाजवादी पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन मुस्ताक सिद्दिकी (माजलगाव) यांनी इशारा दिला आहे की, तात्काळ कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच हा मुद्दा विधानसभेत मांडून सखोल चौकशी लावली जाईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला असून निकृष्ट कामाचे बिल रोखून संबंधित अभियंता, मुख्याधिकारी व गुत्तेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावे, नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ही महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटना माजलगाव तालुकाध्यक्ष तथा समाजवादी पार्टी माजी तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी दिला आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा