अवैध दारू दुकानाविरोधात रणरागिणी पेटून उठल्या दारू दुकान बंद करण्याकरिता जिल्हाधिकारींना निवेदन
परभणी।एस.एम.न्युज़
जिल्ह्याच्या ता.पालम मधील मौजे तांबुळगांव येथील अवैध दारू विकणारा विनायक व्यंकटी गादगे रा. तांबुळगांव, ता. पालम येथील असुन त्यास अवैध दारू विक्री बंद करण्यास तोंडी सांगुन तो ऐकत नाही आणि पालम पोलीस ठाण्यात दिनांक २३एप्रिल २०२६ रोजी तक्रारी निवेदन देऊन ही दखल घेत नाहीत. म्हणून तांबुळगाव च्या रणरागिनी पेटून उठल्या आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तांबुळगावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी केली.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे तांबुळगांव, ता. पालम, जि.परभणी येथील अवैध दारू विकणारा गादगे विनायक व्यंकटी रा. तांबुळगांव येथील असून त्याला अवैध दारू विक्री बंद करण्यास तोंडी सांगुन तो ऐकत नसल्याने प्रथम पालम पोलीस स्टेशनला तक्रार केली. मात्र पोलिसांकडूनही कुठलीच कारवाई करण्यात येत नाही. अवैध दारू विक्रेता म्हणतो की, पालम पोलीस स्टेशनला हप्ते देवुन दारू विकतो. मी कोणाच्या बापाला भित नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. असे तो महिलांसमोर म्हणतो. त्याच्या दारूमुळे तांबुळगावातील अनेक घरांमध्ये दरदिवशी भांडणे चालु आहेत. तसेच अनेकांचे घरे उध्दवस्त झाली आहेत. दारूबंद झाली पाहिजे तसेच त्याच दारूमुळे अनेक नाबालिक तरूण सुद्धा दारूच्या व्यसनी जात आहेत. बाप तर दारू पितोच त्याचे बघुन मुलगा पण दारू पितो. असे सर्व प्रकार आम्हा महिलांना सहन करावे लागत आहे. त्यामुळे आम्हा सर्व महिलांची कळकळीची विनंती आहे की, तांबुळगावातील अवैध दारू विक्री बंद झालीच पाहिजे. निवेदनावर बेबीनंदा भास्कर ससाणे, मिताली, मिनाक्षी धोंडीबा ससाणे, जयश्री मारोतराव उंदरे, कल्पना बाबुराव खरडे आदींची नावे व सह्या आहेत. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना अनिल कोंडीबा उंदरे, भरत जाधव, काशिनाथ एकनाथ आवळे, महादेव ससाने, विश्वजीत ससाने आणि तांबुळगावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा