आमच्या या जन्मात तरी हे रस्ते चांगले तयार होतील का? बीड शहरवासीयांमधून उद्विग्न प्रश्न उपस्थित
बीड शहरवासीयांमधून उद्विग्न प्रश्न उपस्थित
बीड।एस.एम.न्युज़
बीड शहरातील भरपूर दळणवळणाचे असलेले राजुरीवेस ते जुना बाजार मार्गे कोतवाली वेस, राजुरी वेस ते बुंदेलपुरा-कबाड गल्ली मार्गे माळीवेस पोलीस चौकी, ऐतिहासिक कारंजा टॉवर ते जुनी भाजी मंडई मार्गे बुंदेलपुरा आणि बलभीम चौक ते धोंडीपुरा मार्गे माळीवेस चौक पर्यंतचे रस्ते आमच्या या जन्मात तरी चांगले तयार होतील का? असा उद्विग्न प्रश्न या रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहून बीड शहरवासीयांमधून उपस्थित होत आहे. असे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, बीड शहर असो की जिल्हा, येथे निवडून आलेले लोकप्रतिनिधी शापित असतात की, येथील जनतेचे नशीब कपाळकरंटे असतात? हे कळायला आता खरंच मार्ग राहिला नाही. अशी अवस्था बीड जिल्ह्यासह शहराचीही झालेली आहे. शहरांतर्गत असलेले अनेक रस्ते व नाल्यांची दुरावस्था तर झालेली आहेच. मात्र यात वर उल्लेख केलेले रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून कामाच्या प्रतीक्षेत आहेत. या रस्त्यांची अशी काही चाळणी झालेली आहे की विचारायची सोय नाही. म्हणून थातूरमातूर डागडूजी करून म्हणजेच डांबरीकरणाने किंवा कॉंक्रिटीकरणाने खड्डे भरून चालणार नाही. एवढी भयान अवस्था या रस्त्यांची झालेली आहे. अशी दरिद्री अवस्था झाल्याने या मार्गावरून ये-जा करणारे नागरिक कमालीचे वैतागून गेले आहेत. मग ते पादचारी असो की, दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने चालविणारे असो. या रस्त्यांवरून येता-जाता सर्वांनाच अक्षरशः नरक यातना भोगत असल्याचा अनुभव येतो आहे. याकडे ना शासनाचे लक्ष आहे, ना प्रशासनाचे. एवढंच काय जनतेने निवडून दिलेले खासदार-आमदार सुद्धा या रस्त्या करिता आवश्यक ते कार्य करत असल्याचे काही दिसून येत नाही. जिथे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत तिथे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून अपेक्षा करणे म्हणजे फाटक्याकडून आपल्याला सदरा मिळेल अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. ही सर्व अवस्था पाहता आमच्या या जन्मात हे रस्ते चांगले तयार होतील का? असा उद्विग्न प्रश्न बीड शहरवासीयांमधून उपस्थित होऊ लागले आहे. असे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा